काय सांगता..... चक्क म्हैशीची चोरी ; कोठे वाचा बातमी सविस्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 8, 2020

काय सांगता..... चक्क म्हैशीची चोरी ; कोठे वाचा बातमी सविस्तर

 काय सांगता..... चक्क म्हैशीची चोरी ; कोठे वाचा बातमी सविस्तर

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी : कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे लॉकडाऊन केल्याने अनेकांचे ‘अर्थ;चक्र बिघडले. त्यातून चोर तरी कसे सुटतील. त्यांना ही या लॉकडाऊनचा मोठा फटका बसलेला दिसतोय. कारण चोरट्यांनी चक्क म्हैशीची चोरी केल्याची घटना आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे घडली असून याबाबत आटपाडी पोलीस ठाणे मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, शेटफळे येथील धनाजी पांडुरंग गायकवाड यांच्या मालकीची म्हैस ही त्यांच्या शेतामध्ये बांधून घरी आले होते. दिनांक ४ च्या सायंकाळी व दिनांक ५ च्या सकाळी ७.०० च्या दरम्यान त्यांची म्हैस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून सदर घटनेचा अधिक तपास पोहेकॉ मल्ल्याळकर हे करीत आहेत.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस1 comment:

  1. सत्तर दशकात विहीरच चोरीला गेल्याची घटना आहे.

    ReplyDelete

Advertise