बंधाऱ्यात बुडालेल्या शुभम जाधव याचा मृतदेह सापडला ; तिसऱ्या दिवशी प्रयत्नांना यश - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 17, 2020

बंधाऱ्यात बुडालेल्या शुभम जाधव याचा मृतदेह सापडला ; तिसऱ्या दिवशी प्रयत्नांना यशबंधाऱ्यात बुडालेल्या शुभम जाधव याचा मृतदेह सापडला ; तिसऱ्या दिवशी प्रयत्नांना यश  

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी :  आटपाडी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व लहान-मोठे बंधारे व तलाव भरून वाहू लागले असून बंधाऱ्यात बुडालेल्या करगणी-हनुमाननगर येथील शुभम जाधव या तरुणाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी शोध मोहिमेनंतर सापडला.  


आटपाडी तालुक्यात दिनांक १३ व १४ रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे ओढे, नाले, दुधडी भरून वाहू लागले. करगणी-हनुमाननगर येथील युवक शुभम जाधव हा गुरुवारी बंधाऱ्यात बुडाला होता.  बुडाल्या त्या दिवशी जीवरक्षक टीम ला सांगली येथून बोलविण्यात आले होते. परंतु पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने त्या दिवशी शोधमोहिम स्थगित करण्यात आली.  


आज पुन्हा सांगली वरून बोट व पथक बोलविण्यात आले व स्थानिकांच्या मदतीने शोध मोहिम सुरु करण्यात आली. बंधाऱ्यापासून अंदाजे 1 किमी अंतरावर जाधव वस्ती येथे मृत शुभमचा मृतदेह सापडला. तरुणाचा मृतदेह शोधणाऱ्या रॉयल कृष्णा बोट क्लब च्या सदस्यांचा करगणी ग्रामपंचायत तर्फे गौरव करण्यात आला व त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेसNo comments:

Post a Comment

Advertise