जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 26 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करा : जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 8, 2020

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 26 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करा : जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारेजिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 26 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करा : जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे


सांगली : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्यावतीने सन 2019-20 या वर्षाचे जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली येथे 26 ऑक्टोबर 2020 दुपारी 4 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी केले आहे.


श्री. वाघमारे म्हणाले, हे पुरस्कार तीन प्रवर्गात देण्यात येतात. यामध्ये गुणवंत खेळाडू पुरस्कार - 3 (एक पुरूष, एक महिला, एक दिव्यांग खेळाडू), गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार - 1, गुणवंत संघटक / कार्यकर्ता पुरस्कार - 1.  या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, रोख रक्कम 10 हजार रूपये असे आहे. पुरस्काराचे वर्ष दिनांक 01 जुलै ते 30 जून असे राहील. क्रीडा मार्गदर्शकाची कामगिरी सतत दहा वर्षे मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहिजे व वयाची 30 वर्षे पुर्ण व जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल. क्रीडा संघटक कार्यकर्ता वयाची 30 वर्षे पुर्ण केलेली असली पाहिजे व जिल्ह्यातील कामगिरी ग्राह्य धरली जाईल. खेळाडूचे पुरस्कार वर्षासह लगतपुर्व 5 वर्षापैकी दोन वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व केले असले पाहिजे. यापुर्वी सन 2019-20 या वर्षाच्या पुरस्कारासाठी अर्ज सादर केले असल्यास ते ग्राह्य धरले जाणार नाहीत. सदर पुरस्कार अर्ज नव्याने सादर करावेत. जिल्हा क्रीडा पुरस्काराचे अर्ज दिनांक 12 ऑक्टोबर पासून 19 ऑक्टोबर पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली येथे मिळतील.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise