बिहार निवडणुकीच्या मैदानात आता शिवसेनाही ; पदाधिकाऱ्यांनी घेतली संजय राऊतांची भेट - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 3, 2020

बिहार निवडणुकीच्या मैदानात आता शिवसेनाही ; पदाधिकाऱ्यांनी घेतली संजय राऊतांची भेटबिहार निवडणुकीच्या मैदानात आता शिवसेनाही ; पदाधिकाऱ्यांनी घेतली संजय राऊतांची भेट


मुंबई : निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे बिहारमधील आणि देशातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. बिहारमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुंबईत येऊन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये बिहार निवडणुकीच्या मैदानात शिवसेनेने देखील उतरावे, अशी मागणी बिहारमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली आहे.


बिहार प्रमुख हौसलेंद्र शर्मां प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, बिहारमधील शिवसैनिक निवडणुक लढवण्यासाठी उत्सुक आहे. बिहारमधील कमीत-कमी 50 जागा लढवण्याचा विचार आहे. त्यामुळे यासंदर्भात बोलण्यासाठी आम्ही संजय राऊत यांनी भेट घेतली आहे. बिहारमधील शिवसैनिकांची जी मागणी आहे ती संजय राऊतांना सांगितली आहे. त्यामुळे आता निवडणुक लढवायची की नाही, यासंदर्भात अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतली असे हौसलेंद्र शर्मा म्हणाले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
No comments:

Post a Comment

Advertise