उद्यापासून शरद पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर,घेणार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 17, 2020

उद्यापासून शरद पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर,घेणार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावाउद्यापासून शरद पवार  मराठवाड्याच्या दौऱ्यावर,घेणार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा


औरंगाबाद : मराठवाड्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून कापूस, सोयाबीन सारखे काढणीला आलेले पिक वाया गेली. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार उद्यापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यात शरद पवार तुळजापूर, औसा, परांडा, उस्मानाबाद आणि उमरगा येथील शेतीच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. परतीच्या पावसाने मराठवाड्यातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे  १८ आणि १९ ऑक्टोबर असे दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजNo comments:

Post a Comment

Advertise