महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्य सेवा (पूर्व) परिक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 144 लागू - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 8, 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्य सेवा (पूर्व) परिक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 144 लागू


महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्य सेवा (पूर्व) परिक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 144 लागू


सांगली : सांगली व मिरज शहरातील एकूण 27 परीक्षा केंद्रावर दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग - राज्य सेवा (पूर्व) परिक्षा-2020 घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परिक्षा केंद्राच्या ठिकाणी  दि. 11 ऑक्टोबर रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे.


परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परिक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजीचे सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत लागू केले असून खालील कृत्यांना मनाई केली आहे.


या आदेशानुसार वरील वेळेत दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी फिरण्यास मनाई केली आहे. एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. वरील वेळेत परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशीन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच परिक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही.


महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्य सेवा (पुर्व) परिक्षा-2020 सांगली  व मिरज शहरात पुढील ठिकाणी घेण्यात येणार आहे. (1) शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, मिरज-पंढरपूर रोड, मिरज (2) सिटी हायस्कूल, गांवभाग, सांगली (3) कै.ग.रा. पुरोहित कन्या प्रशाला, राजवाडा, सांगली (4) वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, विश्रामबाग सांगली (5) विद्यामंदिर मिरज, ब्राम्हणपुरी, मिरज (6) श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूल, दक्षिण शिवाजीनगर, गुलमोहर कॉलनी सांगली (7) जुबिली गर्ल्स इंग्लिश स्कूल मिरज (8) न्यू इंग्लिश स्कूल (माध्य), मिरज-पंढरपूर रोड, मिरज (9) व्ही. पी. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, स्टडी ॲन्ड रिसर्च, सांगली मिरज रोड, वान्लेसवाडी, सांगली (10) संजय भोकरे ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज, टिळकनगर, वान्लेसवाडी, मिरज (Building "C" Poloytechnic Wing) (11) डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगलीवाडी (12) सांगली हायस्कूल सांगली, अमराई जवळ सांगली (13) मोहंमदियाँ ऍग्लो उर्दू हायस्कूल, जिल्हा परिषद जवळ, सांगली (14) जवाहर हायस्कूल, मिरज शास्त्री चौक मिरज (15) गुलाबराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, मिरज (16) श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील गर्ल्स हायस्कूल, नेमीनाथ नगर सांगली (17) श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, बस स्थानक जवळ, सांगली (18) कन्या महाविद्यालय मिरज  (19) विलींग्डन कॉलेज, विश्रामबाग, सांगली  (20) राणी सरस्वती कन्याशाळा, तानाजी चौक, पेठभाग सांगली (21) श्रीमती चंपाबेन बालचंद शहा, महिला महाविद्यालय, रतनशी नगर, आमराई जवळ सांगली (22) श्रीमती सुंदराबाई दगडे गर्ल्स हायस्कूल, उत्तर शिवाजीनगर सांगली (23) सौ. सक्ष्मीबाई पांडुरंग पाटील विद्यालय सांगलीवाडी (24) जी.ए.हायस्कूल, हरभट रोड, सांगली (25) चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली-मिरज रोड, विश्रामबाग, सांगली (26) सांगली हायस्कूल व श्री विनोद शिवाजी भाटे आर्टस सायन्स व कॉमर्स ज्युनियर कॉलेज सांगली, महावीरनगर अमराई जवळ सांगली (27) शांतिनिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर, सांगली शांतिनिकेतन लोकविद्यापीठ, साखर कारखान्यासमोर, सांगली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise