सांगली जिल्हा प्रशासनाकडून अनलॉक संदर्भात नियमावली जाहीर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 16, 2020

सांगली जिल्हा प्रशासनाकडून अनलॉक संदर्भात नियमावली जाहीर

 


सांगली जिल्हा प्रशासनाकडून अनलॉक संदर्भात नियमावली जाहीर

माणदेश एक्सप्रेस टीम


सांगली : राज्य शासनाकडील निर्देशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेरील भागात खालील बाबींना तसेच क्षेत्रांना 15 ऑक्टोंबरपासून सशर्त परवानगी देण्यात येत आहे.  


दिनांक 19 व 21 मे नुसार जिल्ह्यामध्ये तयार करण्यात येत असलेले कंटेन्टमेंट झोन हे पुढील आदेशापर्यंत कायम राहतील. सर्व प्रकारची जिवनावश्यक वस्तू असलेली दुकाने, आस्थापना तसेच जिल्ह्यात यापूर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या बाबी, क्षेत्रे 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत पुर्ववत सुरु राहतील. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.


15 ऑक्टोंबर पासून पुढील बाबीना परवानगी असेल कंटेनमेंट झोनच्या बाहेरील भागात, खालील नमुद बाबी व्यतिरिक्त सर्व बाबींना परवानगी असेल गृह मंत्रालय, भारत सरकार यांची परवानगी असलेल्या आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाव्यतिरिक्त इतर आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास प्रतिबंधित असेल. 31 ऑक्टोंबर 2020 पर्यत सर्व विद्यार्थ्यासाठी शाळा, कॉलेज, शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था या बंद राहतील. त्याचबरोबर नियमित वर्ग हे देखील बंद राहतील.ऑनलाईन / दुरस्थ शिक्षण हे पुर्वीप्रमाणेच सुरू राहील. सर्व शाळामध्ये ऑनलाईन शिक्षण तसेच दुरध्वनीव्दारे मार्गदर्शन आणि यासंबंधित सर्व कामकाज करणेकामी 50 % शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गास उपस्थित राहणेस परवानगी असेल. त्याबाबतच्या आरोग्य आणि सुरक्षितता प्रतिबंधात्मक उपाययोजना विषयक मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाकडून निर्गमित करण्यात येतील.   
केंद्रीय अर्थसहाय्यीत उच्च शिक्षण संस्था, या संस्थाचे प्रमुख यांची खात्री पटलेस खरेखुरे गरज असलेल्या संशोधन अभ्यासकासाठी (Ph.D.), विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेतील पदवीव्यूत्तर विद्यार्थ्याना ज्या ठिकाणी प्रयोगशाळा / प्रायोगिक कामकाजास परवानगी असेल. इतर सर्व उच्च शिक्षण संस्था जसे की राज्य विद्यापीठे, खाजगी विद्यापीठे इत्यादी, याठिकाणी केवळ संशोधन अभ्यासक (पीएच.डी.) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रवाहातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा / प्रायोगिक कामे यासाठी परवानगी असेल. याबाबत कोविड -19 चा जिल्ह्यातील प्रार्दुभाव पाहून उच्च शिक्षण विभाग, गृह विभागाशी सल्ला मसलत करुन निर्णय घेईल आणि त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे निर्गमित करेल.


सर्व शासकीय आणि खाजगी वाचनालये कोव्हीड -19 विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन सुरु राहतील. सार्वजनिक व खाजगी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध असेल. विवाह, इतर वैयक्तिक कौटुंबिक कार्ये यामध्ये 50 पेक्षा जास्त नसलेल्या व्यक्तींचे एकत्रित येणेस परवानगी असेल आणि अंत्यसंस्कार संबंधित कार्यास 20 व्यक्ती  पेक्षा जास्त व्यक्तीना परवानगी असणार नाही. बागा, उद्याने, सार्वजनिक खुली ठिकाणे सुरु ठेवण्यास परवानगी असेल. बिझनेस टू बिझनेस (B2B) विषयक प्रदर्शनास परवानगी असेल. त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना उद्योग  विभागाकडून निर्गमित करणेत येतील.   


स्थानिक आठवडी बाजार (जनावरांच्या बाजारासह) सुरू राहणेस परवानगी असेल. मात्र कोविड-19 बाबतचा शिष्टाचार काटेकोर पणे पाळला जाईल याची दक्षता घेण्यात यावी. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवणे, गर्दी रोखणेसाठी सर्व मार्केट्स, दुकाने सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वा पर्यंत सुरु राहतील. रेल्वेस्टेशनवर रेल्वेने येणाऱ्या सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी व शिक्का मारणे बंद करण्यात आले आहे. बंदी आदेशातुन सुट दिलेल्या सर्व सेवा व आस्थापनामध्ये वावरणाऱ्या सर्व व्यक्तींनी पूर्ण वेळ मास्क, सॅनिटायझर व सुरक्षीत अंतर इ. बंधने पाळणे आवश्यक आहे.


या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, तालुका कार्यकारी दंडाधिकारी व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखांनी करावी. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise