सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्यासह सात संचालकांचा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, October 4, 2020

सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्यासह सात संचालकांचा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशसांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्यासह सात संचालकांचा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

माणदेश एक्सप्रेस टीम  


सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे सभापती दिनकर पाटील यांनी बाजार समितीच्या सात संचालकासह सांगलीचे पालकमंत्री, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


यामध्ये उपसभापती तानाजी पाटील, माजी उपसभापती जीवन पाटील, कुमार पाटील, बाळासाहेब बंडगर, दीपक शिंदे, वसंतराव गायकवाड, जयश्री भीमराव पाटील, अजित बनसोडे, दयगोंडा बिरादार (संख) यांच्यासह सलगरेचे सरपंच तानाजी पाटील, संतोषवाडीचे नेते खंडेराव जगताप यांनी पक्ष प्रवेश केला. वसंतनगर येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात हा प्रवेश झाला. यावेळी जयंत पाटील संचालकांशी चर्चा करीत बाजार समितीला ताकद देण्याची ग्वाही दिली.  


सदरचा पक्षप्रवेश कार्यकम हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise