दिघंची-ढोलेमळा रस्त्यावरील ओढ्यावरील अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या पुलाची दुरुस्ती - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, October 7, 2020

दिघंची-ढोलेमळा रस्त्यावरील ओढ्यावरील अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या पुलाची दुरुस्तीदिघंची-ढोलेमळा  रस्त्यावरील ओढ्यावरील अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या पुलाची दुरुस्ती

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी : गेल्या महिन्यात आटपाडी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह तालुक्यातील असणाऱ्या गावातील वस्तीला व गावाला जोडणाऱ्या अनेक ओढ्यावरील पुल खचले होते. तर अनेक पुल अर्धवट वाहून गेले होते. तर राष्ट्रीय मार्गासह अनेक गावातील रस्ते खचले असून ते दुरुस्त करण्याचे काही काही ठिकाणी झाले आहे. तर काही ठिकाणी अजूनही काम चालू आहे.


दिघंची येथील ढोले मळा व दिघंची गावाला जोडणारा ओढ्यावरील पुल वाहून गेला होता. सदरचा पुल अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने नागरिकांची हाल होत होते. परंतु आता सदर पुलाचे काम झाले असून सदरचा पुल वाहतुकीसाठी पूर्ववत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise