आंदोलनाच्या धसक्याने माडगुळे प्रादेशिक पिण्याच्या पाण्याची पाईप-लाईन दुरुस्ती ; राजेंद्र खरात - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 16, 2020

आंदोलनाच्या धसक्याने माडगुळे प्रादेशिक पिण्याच्या पाण्याची पाईप-लाईन दुरुस्ती ; राजेंद्र खरातआंदोलनाच्या धसक्याने माडगुळे प्रादेशिक पिण्याच्या पाण्याची पाईप-लाईन दुरुस्ती ; राजेंद्र खरात 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील शेटफळे चौक ते बस स्थानक रोड वरती असणाऱ्या मंगलमुर्ती मॉल समोर रस्त्याच्या एका बाजूला असणारी पाण्याची पाईप-लाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून या वाया जाणाऱ्या पाण्याचा त्रास तेथील सर्वसामान्य नागरिकांबरोबरच वाहन धारकांना होत असल्याने सदरची पाण्याची पाईप-लाईन दुरुस्ती करावी अशी मागणी आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केली होती. अन्यथा माडगुळे प्रादेशिक योजनेचे विरोधात पंचायत समितीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

आरपीआयच्या आंदोलनाच्या धसक्याने फुटलेली पाईप-लाईन माडगुळे प्रादेशिक योजनेच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्त केली असून या ठिकाणहून होणारी पाण्याची गळती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सदर माडगुळे प्रादेशिक योजनेच्या विरोधात करण्यात येणारे आंदोलन पाईप-लाईन दुरुस्त करण्यात आली असल्याने स्थगित करण्यात आले असल्याची माहिती आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी दिली आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
No comments:

Post a Comment

Advertise