रब्बी ज्वारी अधिक उत्पादन करता सुधारित तंत्रज्ञान : कृषि सहाय्यक रविंद्र घुटूकडे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 8, 2020

रब्बी ज्वारी अधिक उत्पादन करता सुधारित तंत्रज्ञान : कृषि सहाय्यक रविंद्र घुटूकडे


रब्बी ज्वारी अधिक उत्पादन करता सुधारित तंत्रज्ञान : कृषि सहाय्यक रविंद्र घुटूकडे

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/धिरज प्रक्षाळे : रब्बी ज्वारी अधिक उत्पादन करता सुधारित तंत्रज्ञान आले असून याबाबत कामथ ता. आटपाडी, जि.सांगली येथील शेतकऱ्यांना कृषि सहाय्यक रविंद्र घुटूकडे यांनी मार्गदर्शन केले.


रब्बी ज्वारीची पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोंबर या कालावधीत पावसाच्या ओलाव्यावर जमिनीत पाच सेंटीमीटर खोल करावी.कोरडवाहूसाठी सुधारित वाण मालदांडी -३५-१ बागायत ज्वारीसाठी फुले रेवती, फुले वसुधा या वाणांची निवड करावी. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास चार ग्रॅम गंधक चोळावे तसेच झोटोबॅक्‍टर व पीएसबी या जिवाणूंची बीज प्रक्रिया करावी.


कोरडवाहू हलक्या जमिनीसाठी एकरी दहा किलो नत्र (२२किलो युरिया ), कोरडवाहू मध्यम जमिनीसाठी एकरी 16 किलो नत्र (३५ किलो युरिया) अधिक आठ किलो स्फुरद (५०किलो सिंगल सुपर फॉस्फेट), बागायती मध्यम जमिनीसाठी ३२ किलो नत्र (७०किलो युरिया) अधिक 16 किलो स्फुरद (१००किलो सिंगल सुपर फॉस्फेट) अधिक 16 किलो पालाश (२८ किलो मुरेट ऑफ पोटॅश) द्यावे. कोरडवाहू भारी जमिनीसाठी एकरी 24 किलो नत्र (५२किलो युरिया) अधिक १२ किलो स्फुरद (७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) द्यावे.


बागायती भारी जमिनीसाठी एकरी 40 किलो नत्र (८७किलो युरिया) अधिक 20 किलो स्फुरद (१२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) अधिक 20 किलो  पालाश (३४ किलो मुरेट ऑफ पोटॅश) द्यावे. तसेच नत्र दोन हप्त्यात (पेरणी वेळी अर्धे व पेरणीनंतर एक महिन्याने अर्धे) संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणी वेळी द्यावे. कोरडवाहू जमिनीत संपूर्ण नत्र व स्फुरद पेरणी वेळी द्यावे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise