पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले 'अटल बोगद्याचे' उद्घाटन ; चीनला भरणार धडकी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 3, 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले 'अटल बोगद्याचे' उद्घाटन ; चीनला भरणार धडकीपंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले 'अटल बोगद्याचे' उद्घाटन ; चीनला भरणार धडकी 


मनाली : हिमालयाच्या डोंगरदऱ्यांना भेदून बनविण्यात आलेल्या अटल बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आले. हा बोगदा समुद्रसपाटीपासून 3060 मीटर उंच आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते. यामुळे येथील मोठ्या प्रदेशाचा संपर्क तुटतो. या टनेलमुळे आता 12 ही महिने हा प्रदेश संपर्कात राहणार आहे.


जगातील सर्वात मोठा आणि चीनला शह देणारा अटल बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सीडीएस जनरल बीपीन रावत आणि लष्करप्रमुख एमएम नरवणे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आदी उपस्थित होते. जवळपास 9 किमी लांबीचा आणि 10000 फुटांहून अधिक उंचीवर हा बोगदा बांधण्यात आला आहे.

 


  • या बोगद्याची वैशिष्ट्ये...
  • हिमालयाच्या डोंगरदऱ्यांना भेदून बनविण्यात आलेला हा बोगदा खूप खास आहे. हा बोगदा समुद्रसपाटीपासून 3060 मीटर उंच आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते. यामुळे येथील मोठ्या प्रदेशाचा संपर्क तुटतो. या टनेलमुळे आता 12 ही महिने हा प्रदेश संपर्कात राहणार आहे. हा टनेल बांधण्य़ाचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी 2000 मध्ये घेतला होता. मनाली आणि लेहचे अंतरही मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. डोंगररांगांचा, घाटाचा 46 किमीचा रस्ता कमी झाला आहे. मनावी ते लेह हे 474 किमीचे अंतर या बोगद्यामुळे 428 किमी होणार आहे. हा बोगदा खोदताना कटिंग एज तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. घोड्याच्या नालेसारखा या बोगद्याचा आकार आहे. महत्वाचे म्हणजे दोन्ही बाजुसाठी दोन वेगवेगळे बोगदे आहेत. प्रत्येक बाजुला सिंगल टयूब असून डबल लेन आहे. 10.5 मीटरची रुंदीचा हा बोगदा आहे. मुख्य बोगद्यामध्ये 3.6 x 2.25 मीटरचा आगरोधक इमरजन्सी टनल बनविण्यात आला आहे. 10000 फुटांवरील या बोगद्याला बनविण्यासाठी 10 वर्षे लागली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise