'माझे कुंटुब माझी जबाबदारी’ योजनेचे सायकल रॅली ने प्रबोधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 3, 2020

'माझे कुंटुब माझी जबाबदारी’ योजनेचे सायकल रॅली ने प्रबोधन'माझे कुंटुब माझी जबाबदारी’ योजनेचे सायकल रॅली ने प्रबोधन 

माणदेश एक्सप्रेस टीम  


सदशिवनगर/विष्णू भोंगळे : ‘माझे कुंटुब माझी जबाबदारी’ या अंर्तगत पुरंदावडे ता. माळशिरस, जि.सोलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पुरंदावडे, ग्रामपंचायत  सदाशिवनगर, अंगणवाडी, आशा वर्कर यांनी कोरोना या संसर्गजन्य रोगाबाबत जनजागृती उपाय योजना व कुंटुबाने घ्यावयाची काळजी याबाबत सायकल रॅली काढुन सदाशिवनगर परिसरातील नागरिकांचे प्रबोधन केले.


महाराष्ट्र शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या योजने अंतर्गत प्रत्येक गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येणार असून कुटुंबातील प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. ज्यांना कोरोना या संसर्गजन्य रोगाची लक्षणे दिसतील त्यांना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविण्यात येणार आहेत.


डॉ.रामचंद मोहिते यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच डॉ. सोनाली मेहता यांच्या उपस्थितीत सर्व आरोग्य कर्मचारी सरपंच नागनाथ ओवाळ, ग्रामसेवक प्रशांत रूपनवर, सोमनाथ भोसले, विष्णु भोंगळे, पोलिस पाटील अर्पणा लोंढे, आरोग्य सेवक सुनिल लोंढे, वंदना चंदेल, महादेव धाईजे, अनिता साखरे व सर्व ग्रामपंचायत  कर्मचारी या सायकल रॅली ला उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise