रमाई आवास घरकुल योजनेचे हप्ते द्या ; अन्यथा आरपीआय करणार तीव्र आंदोलन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, October 26, 2020

रमाई आवास घरकुल योजनेचे हप्ते द्या ; अन्यथा आरपीआय करणार तीव्र आंदोलनरमाई आवास घरकुल योजनेचे हप्ते द्या ; अन्यथा आरपीआय करणार तीव्र आंदोलन 

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/धिरज प्रक्षाळे : रमाई आवास घरकुल योजनेचे थकलेले हप्ते द्या, अन्यथा आरपीआय करणार तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन आटपाडी तालुका आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी आटपाडी तालुका गटविकास अधिकारी यांना दिले आहे.


केंद्र सरकारने ज्यांना घर नाही व ज्यांचे घर पडले असून ज्यांना घर बांधणे परवडत नाही अशा सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रधानमंत्री घरकुल आवास योजना व मागासवर्गीय लोकांसाठी रमाई आवास घरकुल योजना राबविली परंतु देशामध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले व अनेक घरकुलांचे हप्ते थांबले गेले. अनेकांनी घरकुले उसनवार पैसे घेवून केली. परंतु अद्याप ही शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे रमाई आवास योजनेतील अनेक लाभार्थी नागरिकांचे पैसे थांबले गेल्याने त्यांची आर्थिक कुचंबना होवू लागली आहे. 


त्यामुळे रमाई आवास घरकुल योजनेचे थकलेले हप्ते ताबडतोप लाभार्थी यांच्या खात्यावर जमा करावे अन्यथा आटपाडी पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचे राजेंद्र खरात म्हणाले.  Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise