पाचेगाव बुद्रुक येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, October 26, 2020

पाचेगाव बुद्रुक येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामेपाचेगाव बुद्रुक येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे  


सांगोला : पाचेगाव बुद्रुक ता. सांगोला येथे अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त बागायती व जिरायती पिकांचे थेट बांधावर जाऊन प्रत्यक्षात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करुन कृषी सहाय्यक एस.डी. गवळी, तलाठी अमित धनवडे, ग्रामसेवक ए.एस. इंगवले पंचनामे करत आहेत. शेतकरी मित्र देवाप्पा इरकर, लिपिक शशिकांत मंडले, संगणक परिचालक संजय खरात, कर्मचारी अशोक दौंड त्यांना याकामी मदत करत आहेत.


थेट बांधावर येवून पंचनामे होते असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांनी सातबारा, आठ अ, आधारकार्ड झेरॉक्स प्रत, बँक पासबुक झेरॉक्स प्रत, नोटकॅम अप्लिकेशन मधील शेतीच्या नुकसानीचा फोटो ही सर्व कागदपत्रे जमा करुन सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise