गोमेवाडीत राजकीय नेत्याच्या नव्हे, तर १२ वर्षाच्या चि. अर्थव च्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, October 4, 2020

गोमेवाडीत राजकीय नेत्याच्या नव्हे, तर १२ वर्षाच्या चि. अर्थव च्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजनगोमेवाडीत राजकीय नेत्याच्या नव्हे, तर १२ वर्षाच्या चि. अर्थव च्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/धिरज प्रक्षाळे : सध्या युवा व प्रस्थापित नेत्यांच्या व वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते यांच्याच रक्तदान शिबीर घेण्यासाठी चढाओढ लागलेली असते. आपणच नेत्याचे किती समर्थक आहोत हे दाखविण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.


परंतु याला अपवाद मात्र गोमेवाडी गाव ठरले असून येथील १२ वर्षीय अर्थव सोहनी याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या कुटुंबीयांनी व नागरिकांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजन करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. गोमेवाडी येथील विनोद सोहनी यांचा मुलगा चि. अर्थव सोहनी याच्या १२ व्या वाढदिवसानिमित्त सदरच्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चि.अर्थव याला थॅलसामिया हा आजार आहे. यासाठी त्याला दर १५ दिवसांनी एक रक्ताची बॅग लागते. समाजामध्ये अशी कितीतरी लहान मुले आहेत कि त्यांना हि रक्ताची गरज लागते. अशावेळी रक्तदान शिबीर आयोजन करून रक्त जमा केले जाते.


त्यामुळे उद्या दिनांक ५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत गोमेवाडी ता. आटपाडी, जि.सांगली येथील बौध्दविहारा जवळ सदरच्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये रक्तदान करण्याऱ्या रक्तदात्यास चि. अर्थव याच्या वाढदिवसानिमित्त आकर्षक भेटवस्तू ही देण्यात येणार आहे. त्यामुळे सदर रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेवून आपण रक्तदान करावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजNo comments:

Post a Comment

Advertise