Type Here to Get Search Results !

पुणे शिक्षक/पदवीधर मतदारसंघातून नवतरूणांला संधी द्यावी : प्रा.एन.पी.खरजे व शिष्टमंडळाची मागणी



पुणे शिक्षक/पदवीधर मतदारसंघातून नवतरूणांला संधी द्यावी : प्रा.एन.पी.खरजे व शिष्टमंडळाची मागणी

माणदेश एक्सप्रेस टीम  


निंबवडे/वार्ताहर : पुणे शिक्षक/पदवीधर मतदारसंघातून प्रामाणिक, उच्चशिक्षित नवतरूणांला संधी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील व सांगली जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्याकडे प्रा.एन.पी.खरजे, प्रा.प्रविण गावडे, दिलीप कचरे, राघव मेटकरी, सागर पाटील व पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


महाराष्ट्रातील नवीन २४५० ते २५०० पदवीधर मतदार यांची ऑनलाईन नोंदणी केली आहे. तसेच यावेळी जास्त प्रमाणात नवतरुण मतदारांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे पदवीधर/शिक्षक मतदारसंघातून होतकरू उच्च शिक्षित, शैक्षणिक प्रश्नांची जाण असलेल्या तरूणाला प्रतिनिधित्व मिळावे. जेणेकरून शैक्षणिक समस्या चांगल्याप्रकारे सोडविण्यासाठी ते कायमच सक्रियपणे जबाबदारीने काम करतील. तसेच नवतरूणांना संधी दिल्याने राजकारण, समाजकार्य, शैक्षणिक कार्य करण्यासाठी महाराष्ट्रातील तरूण प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे येऊ शकतील. व ही संधी सत्तेपासून वंचित असलेल्या घटकांना मिळावी अशी आग्रही मागणी प्रा.एन.पी. खरजे व शिष्टमंडळ यांनी केली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies