१ नोव्हेंबरपर्यंत मंदिरं खुली करा अन्यथा, मंदिरांची टाळी फोडू : भाजपचा ठाकरे सरकारला इशारा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, October 28, 2020

१ नोव्हेंबरपर्यंत मंदिरं खुली करा अन्यथा, मंदिरांची टाळी फोडू : भाजपचा ठाकरे सरकारला इशारा१ नोव्हेंबरपर्यंत मंदिरं खुली करा अन्यथा, मंदिरांची टाळी फोडू : भाजपचा ठाकरे सरकारला इशारा 

मुंबई : राज्यात आता हॉटेल, बार, सिनेमाहॉल यासारख्या अनेक गोष्टीना परवानगी दिल्याने आता मंदिरेच बंद का असा सवाल सरकारला करण्यात येत आहे. राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. मंदिरं उघडण्याची मागणी करणारं पत्र त्यांनी राज्यपालांना दिलं. ठाकरे सरकारनं १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरं खुली करण्याचा निर्णय न घेतल्यास मंदिरांची टाळी फोडू, असा स्पष्ट इशारा भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसलेंनी राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरे सरकारला दिला आहे.

राज्यातील मंदिरं गेल्या ७ महिन्यांपासून बंद आहेत. इतर सर्व गोष्टी सुरू करण्यात आल्या असताना मंदिरं मात्र बंद ठेवली गेली आहेत. मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी याआधी आम्ही राज्यभर घंटानाद आंदोलन केलं. मात्र ठाकरे सरकारनं त्याची दखल घेतली नाही. आता सरकारनं १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरं खुली करण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा मंदिरांची टाळी फोडू, अशी भूमिका भोसलेंनी मांडली. No comments:

Post a Comment

Advertise