Type Here to Get Search Results !

मिटकीतील ओलेकर वस्ती साठवण तलाव फुटला ; आटपाडीच्या शुक्र ओढ्याला पाणी वाढण्याची शक्यता



मिटकीतील ओलेकर वस्ती साठवण तलाव फुटला ; आटपाडीच्या शुक्र ओढ्याला पाणी वाढण्याची शक्यता 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : मिटकी ता. आटपाडी जि. सांगली येथील ओलेकरवस्ती साठवण तलावा आज झालेल्या पावसाने दमदार पावसाने फुटला असून तलावा शेजारील असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  


आज आटपाडी तालुक्यात पश्चिम भागात असणाऱ्या खरसुंडी जिल्हा परिषद गटामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसाने अनेक गावांना जोडणारे गाव ओढ्यावरील पुल पाण्या खाली गेल्याने अनेक ठिकाणची वाहतूक बंद झाली होती. मिटकी येथील ओलेकर वस्ती साठवण तलाव अंदाजे २० वर्षापूर्वी निर्माण करण्यात आला आहे. तर गेली सहा महिन्यापूर्वी याच तलावाची दुरुस्ती करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष जालिंदर कटरे यांनी दिली.

परंतु आज झालेल्या दमदार पावसाने साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून प्रचंड वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे सदर तलाव फुटल्याने या तलावाशेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर याच तलावाचे पाणी बनपुरी साठवण तलावात येत असून सदरचा तलाव ही पूर्ण भरला असून पुढे या तलावाचे पाणी आटपाडी साठवण येते. त्यामुळे आटपाडीच्या शुक्र ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आली असून आटपाडीतील बाजार पटांगण येथील पुलावर अंदाजे २ टे ३ फुट पाणी आले असून वाहतूक बंद करण्यात आली असून अजून ही पाणी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.    


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies