म्हसवड पालिका कर्मचारी यांनी दाखविले माणुसकीचे दर्शन ; पूर परिस्थितीत माण नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी आणले - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 16, 2020

म्हसवड पालिका कर्मचारी यांनी दाखविले माणुसकीचे दर्शन ; पूर परिस्थितीत माण नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी आणलेम्हसवड पालिका कर्मचारी यांनी दाखविले माणुसकीचे दर्शन ; पूर परिस्थितीत माण नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी आणले

माणदेश एक्सप्रेस टीम  


म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड शहराला सलग दोन दिवस परतीच्या पाऊसाचा तडाखा दिला असून शहराच्या इतिहासात प्रथमच अतिवृष्टी झाल्याने, बारमाही कोरडी असलेल्या माणगंगानदीला महापुर येऊन नदीकाठच्या लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. या बिकट परिस्थिती मध्ये, म्हसवड नगरपालिका कर्मचारी यांनी माणुसकीचे दर्शन घडवत अनेक वयस्कर वृध्दांना पाटकूळीवरून सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम केल्याने पालिका कर्मचाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  
म्हसवड शहराच्या इतिहासात प्रथमच माणगंगा नदीला मोठा महापुर आला असून नदीपात्र दुधडी भरून वाहत आहे. श्री सिध्दनाथ यात्रा (रिंगावण) पटांगण पुल व माणदेशी फौंडेशनने बांधलेला बंधारा या वरून दोन फुट पाणी वाहात आहे. संपुर्ण परिसरात पाणीच पाणी साचलेले आहे. भाजी मंडईतील शेड व पानटपरी पाण्यात वाहून गेली आहे. स्मशानभूमीत व गार्डन मध्ये पाणी शिरले होते.


म्हसवड येथील विश्रामगृहाजवळ माणगंगा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. माणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागल्यानंतर या बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले. या ठिकाणी नदीचा काठाला दहिवाडेमळा आहे. या ठिकाणच्या लोकांना पुराचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन माने यांचे मार्गदर्शनाखाली नगरपालिका कर्मचारी सागर सारतापे व इतर कर्मचारी यांनी तातडीने दहिवडे मळ्यात जाऊन माणुसकीचे दर्शन घडवत अक्षरशा वृध्दांना पाटकूळीवरून पायपीट करून सुरक्षित स्थळी हलवले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

योग्यवेळी मुख्याधिकारी व कर्मचारी यांनी हालचाल करून दहिवडे मळ्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवल्याबद्दल त्यांचे कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
No comments:

Post a Comment

Advertise