आटपाडीत दिनांक १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मनसेच्या मेळाव्याची जोरदार तयारी ; अविनाश जाधव यांची प्रमुख उपस्थिती - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 30, 2020

आटपाडीत दिनांक १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मनसेच्या मेळाव्याची जोरदार तयारी ; अविनाश जाधव यांची प्रमुख उपस्थितीआटपाडीत दिनांक १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मनसेच्या मेळाव्याची जोरदार तयारी ; अविनाश जाधव यांची प्रमुख उपस्थिती 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी : राज्यातील तरुणांचे प्रमुख आकर्षण असलेल्या राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षाचा पश्चिम महाराष्ट्रातील खानापूर मतदार संघातील आटपाडी तालुक्यात दिनांक १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी दिली.

आटपाडी तालुक्यात प्रथमच मनसेचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात आटपाडी तालुक्यातील “पॅनकार्ड क्लब लि” यामध्ये गुंतवणूक केलेल्या बाधितांचा मेळावा होणार आहे. तर यावेळी अनेक कार्यकर्ते मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत. यानंतर मनसेच्या वतीने तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात येणार आहे.


या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनसेची मुलुख मैदान तोफ  व ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आटपाडी तालुक्यातील प्रमुख चौका-चौकामध्ये फ्लेक्स लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे मनसेच्या या होणाऱ्या मेळाव्याकडे आटपाडी तालुक्यातील राजकीय पक्षांचे सुद्धा लक्ष लागले आहे.      


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise