मराठी भाषा अपमान प्रकरण : कलर्स वाहिनेनं मागितली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माफी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, October 28, 2020

मराठी भाषा अपमान प्रकरण : कलर्स वाहिनेनं मागितली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माफी
मराठी भाषा अपमान प्रकरण : कलर्स वाहिनेनं मागितली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माफी


मुंबई: बिग बॉस कार्यक्रमात मराठीचा अपमान करणाऱ्या गायक जान कुमार सानू विरोधात मनसे, शिवसेने यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने बिग बॉस कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या 'कलर्स' वाहिनीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माफी मागितली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्यानं आम्ही माफी मागतो, असं कलर्सनं मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला आहे.

बिग बॉसच्या १४ व्या हंगामात निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्यात वाद झाला. त्यावेळी निक्की तांबोळी मराठीत बोलत होती. त्यावरून जाननं राग व्यक्त केला. मला मराठी भाषेची चीड येते, असं जाननं म्हटलं. यावरून मनसेनं आक्रमक भूमिका घेत जानला थेट इशारा दिला आहे. तर शिवसेनेनं जानची हकालपट्टी करण्याची मागणी केली. यानंतर कलर्सनं मुख्यमंत्र्यानी पत्र लिहून माफी मागितली.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
No comments:

Post a Comment

Advertise