मराठा आरक्षणप्रश्नी ५८० किमी पायी प्रवास ; मंत्री जयंत पाटील यांनी जाणून घेतले सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे मत - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 29, 2020

मराठा आरक्षणप्रश्नी ५८० किमी पायी प्रवास ; मंत्री जयंत पाटील यांनी जाणून घेतले सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे मतमराठा आरक्षणप्रश्नी ५८० किमी पायी प्रवास ; मंत्री जयंत पाटील यांनी जाणून घेतले सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे मत 

माणदेश एक्सप्रेस टीम  आटपाडी : सध्या राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने सुरु आहेत. याच मराठा आरक्षण प्रश्नी तब्बल ५८० किलीमीटर पायी प्रवास करत मुंबईला पोहचलेल्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भेट घेतली.मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले होत्ते. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला होते. परंतु आरक्षणाचा मुद्दा कोर्टामध्ये गेल्यावर त्याला स्थगिती मिळाली होती. 
स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात पुन्हा वेगवेगळी आंदोलने सुरु झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तुळजापूर ते मुंबई असा ५८० किलोमीटरचा पायी प्रवास करत सकल मराठा समजाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात भेट घेतली. यावेळी मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे मत जाणून घेतले. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे हे उपस्थित होते. 

संपादक :  धिरज प्रक्षाळेJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise