खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा धनगर आरक्षणास पाठिंबा ; आमदार गोपीचंद पडळकर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 2, 2020

खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा धनगर आरक्षणास पाठिंबा ; आमदार गोपीचंद पडळकर

आमदार गोपीचंद पडळकर खासदार छत्रपती संभाजीराजे


खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा धनगर आरक्षणास पाठिंबा ; आमदार गोपीचंद पडळकर 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी : सध्या राज्यामध्ये आरक्षणावरून जोरदार आंदोलन सुरु आहेत. एकीकडे मराठा आरक्षण आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे धनगर आरक्षणचा मुद्दा व आंदोलन गाजत आहे.  


मराठा आंदोलनाचे नेते खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपला पाठिंबा धनगर आरक्षणास असल्याचे पत्र आमदार गोपीचंद पडळकर यांना दिल्याने धनगर आरक्षण आंदोलनास बळ मिळणारे असल्याचे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले असून पाठिंब्याचे पत्र दिल्याबद्दल त्यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे आभार मानले आहेत.


खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे पत्र

प्रति, मा. 

श्री. गोपीचंद पडळकर 

आमदार, महाराष्ट्र. 

महोदय, 

आपण मला धनगर समाजच्या आरक्षण लढ्याला सहकार्य करण्याची विनंती केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि आरक्षणाचे जनक, राजर्षी शाहू महाराजांच्या वंशजाच्या नात्याने बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी कष्ट करत आहे. त्याच बरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याकरिता सुद्धा प्रयत्नशील आहे. आपल्याला आठवत असेल, चोंडी मध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती दिनी, भाषण करत असताना मी धनगर समाजाला शब्द दिला होता की, मी धनगर समाजाच्या लढ्यात नक्की सहकार्य करेन. दिल्या शब्दप्रमाणे मी, राज्य सरकार आणि केंद्र सरकार सोबत पत्रव्यवहारही केला आहे. सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. अपल्यासाहित संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, की मी केवळ बोलत नाही तर प्रत्यक्ष कृती करतो. यापूढेही धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न असतील. आपल्या माध्यमातून धनगर समाजालाही विनंती राहील की, मराठा समाज तुमच्या पाठीमागे ठाम पणे उभा आहेच, आपण सुध्दा एकजुटीने मराठा समाजाच्या पाठीमागे उभं राहावं.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise