शरद पवारांच्या खांद्यावरून उतरून आमदार रोहित पवारांनी मतदार संघात उतरावे ; आमदार गोपीचंद पडळकर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 10, 2020

शरद पवारांच्या खांद्यावरून उतरून आमदार रोहित पवारांनी मतदार संघात उतरावे ; आमदार गोपीचंद पडळकरशरद पवारांच्या खांद्यावरून उतरून आमदार रोहित पवारांनी मतदार संघात उतरावे ; आमदार गोपीचंद पडळकर 

माणदेश एक्सप्रेस टीम  

आटपाडी : शरद पवार यांच्या खांद्यावर बसून महाराष्ट्र सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या खांद्यावरून खाली उतरून त्यांच्या मतदार संघात येवून विकास कामे करावीत असे आवाहन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांना दिले.  


आमदार गोपीचंद पडळकर हे औरंगाबाद दौऱ्यावर जात असताना त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघातील मिरजगाव या ठिकाणी थांबले होते. यावेळी त्यांनी स्वत: रस्त्यावर उभा राहून त्यांच्या ट्विटर अकाऊटं वरून व्हिडोओ शेअर केला असून मतदार संघातील रस्त्याच्या परिस्थितीबाबत त्यांना जाणीव करून दिली आहे.


 याबाबत त्यांनी  ट्वीटमध्ये काय म्हणाले आहेत पाहूया


पन्नास वर्षे राजकीय नेतृत्व करणारे शरदचंद्रजी पवार यांचे नातू रोहित पवार हे ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत या मतदारसंघातून औरंगाबाद दौऱ्यावर जात असताना रस्त्यावरती प्रचंड खड्डे आहेत. रोहित पवार दररोज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणीस यांना सल्ले देत असतात त्यामुळे त्यांना त्यांची उंची वाढल्यासारखी वाटत आहे. परंतु त्यांना अजून माहीत नाही ते शरद पवार यांच्या खांद्यावर बसून त्यांची उंची मोजतात. रोहितदादा तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल. मिरजगाव येथील रस्ता पूर्णता: खराब झाला असून तुम्हाला साधा गावातील रस्ता करता येत नसेल आणि तुम्ही देशाचे नेतृत्वाला जर सल्ले देत आहात. कर्जत मतदारसंघातील मिरजगाव येथील रस्ते खराब झाले असून या रस्त्यावरून प्रचंड रहदारी आहे. या गावांमध्ये येऊन लोकांचे प्रश्न जाणून घ्या. राज्यांमध्ये तुमचे सरकार आहे. कर्जत मतदारसंघातील रस्ते तुम्ही लवकरात लवकर दुरुस्त करावेत, चांगले करावेत मगच बाकीच्या लोकांना सल्ले द्यावेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise