दलितवस्तीमध्ये मंजूर झालेले हायमास्ट पोल दलितवस्तीमध्ये बसवा ; संजय यमगर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 1, 2020

दलितवस्तीमध्ये मंजूर झालेले हायमास्ट पोल दलितवस्तीमध्ये बसवा ; संजय यमगर

संजय यमगर बनपुरी


दलितवस्तीमध्ये मंजूर झालेले हायमास्ट पोल दलितवस्तीमध्ये बसवा ; संजय यमगर 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी : बनपुरी ता. आटपाडी, जि. सांगली गावातील दलितवस्ती मध्ये समाजकल्याण विभाग सांगली यांच्याकडून ४ हायमास्ट पोल मंजूर झाले असून मंजूर झालेले हायमास्ट पोल हे दलितवस्तीमध्येच बसविण्याची मागणी बनपुरीचे युवा नेते संजय यमगर यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


बनपुरी गावाला समाज कल्याण विभाग सांगली यांच्याकडून सन २०१९/२० सालामध्ये दलितवस्तीचा विकास करणे अंतर्गत कामासाठी ४ हायमास्ट पोल मंजूर झाले आहेत. सदरचे हायमास्ट पोल हे दलितवस्तीमध्ये बसविणे आवश्यक आहे. परंतु सदरचे पोल उभा करीत असताना पोलचे फौंडेशन हे रस्त्यालगत केले आहे. त्यामुळे सदर हायमास्ट पोलचा उपयोग हा दलितवस्तीला होणार नाही. त्यामुळे रस्त्यालगत हायमास्ट पोलचे केलेले फौंडेशनचे काम बंद करण्यात यावे व दलितवस्ती मध्ये सदरच्या हायमास्ट पोलचे काम सुरु करून त्या ठिकाणी हायमास्ट पोल उभे करण्यात यावे ज्याचा उपयोग दलितवस्ती मधील बांधवांना होणार आहे.  


त्यामुळे सदरच्या कामाबाबत आपण चौकशी करून रस्त्यालगत सुरु असलेले हायमास्ट पोलचे काम बंद करून ते दलितवस्ती सुरु करावे अशी मागणी संजय यमगर यांनी केली असून निवेदनाच्या प्रति गटविकास अधिकारी आटपाडी व ग्रामसेवक ग्रामपंचायत बनपुरी यांना देण्यात आलेल्या आहेत.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise