सरकार कडून आता ५० % शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत शाळा सुरु करण्याचे संकेत - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 29, 2020

सरकार कडून आता ५० % शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत शाळा सुरु करण्याचे संकेत


 सरकार कडून आता ५० % शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत शाळा सुरु करण्याचे संकेत 


मुंबई : राज्यातील शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती ५० टक्के करण्याचा निर्णय हा ठाकरे सरकारने घेतला आहे. कोरोना आणि लॉकडाउन यामुळे राज्यातील शाळा १५ जून २०२० ला सुरु होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु करुन स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात आल्या. त्यासाठीचे निर्णय संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या सहमतीने घेतले गेले. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत सर्व आस्थापना टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

जे शिक्षक लोकल ट्रेन, बस व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात त्यांनी मास्क व शारीरिक अंतराबाबतचे नियम पाळावेत. तसेच तोंडाला हात लावू नये,  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शाळेच्या प्रवेशद्वारावर तपासणी, कर्मचाऱ्यांना मास्ती सक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेच्या परिसरात वावरताना किमान सहा फूट शारीरिक अंतर ठेवून वापरण्यास मुभा देण्यात आले आहे. 


शाळेमध्ये हात स्वच्छ धुण्यासाठी साबण व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश शाळा प्रशासनाला दिले आहेत. शाळेतील स्वच्छतागृहांचे निर्जंतुकीकरण वारंवार करण्यात यावे तसेच शाळेच्या परिसराचे दिवसातून किमान एक वेळ स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे. कुटुंबातील कोणी कोविड अबाधित असल्यास त्यांनी शाळेत येऊ नये, चिंता आणि निराशा सारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या असणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी समुपदेशन करण्याची व्यवस्था करावी इत्यादी सूचना आज शालेय शिक्षण विभागाने करत शाळा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise