Type Here to Get Search Results !

भारताची अर्थव्यवस्था रुळावर येत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी



भारताची अर्थव्यवस्था रुळावर येत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली : परकीय गुंतवणुकात १३टक्के वाढ झाली असून भारत अजूनही २०२४ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठू शकतो असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. आर्थिक सुधारणा सुरूच राहतील पण राज्यांनीही गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करावे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.  





कोरोना व्हायरस संकटात किती जीव वाचवण्यात आपण यशस्वी ठरलो, यावर मोहिमेचं यशापयश मोजले जावे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पीएम मोदी म्हणाले की, भारतात कृषी, एफडीआय, उत्पादन आणि वाहनांच्या विक्रीत तेजी दिसून आली आहे. ईपीएफओमध्ये सहभागी होणारे अधिक लोक  नोकर्याक देखील वाढल्या असल्याचे दर्शवित आहेत. भारताची अर्थव्यवस्था सावरण्याच्या मार्गावर आहे. कृषी आणि कामगार क्षेत्रात सुधारणेबाबत मोदी म्हणाले की, आता भारतातील जागतिक गुंतवणूकदारांकडून मोठा संकेत मिळाला आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies