Type Here to Get Search Results !

माणदेशी फाउंडेशन च्या गोंदावले येथील कोविड सेंटरचे उद्घाटन संपन्न



माणदेशी फाउंडेशन च्या गोंदावले येथील कोविड सेंटरचे उद्घाटन संपन्न 

माणदेश एक्सप्रेस टीम  



म्हसवड : माणदेशी फाउंडेशन म्हसवडच्या वतीने श्रीमती चेतना सिन्हा यांनी गोंदवल्यात सुरू केलेले २२ बेडचे कोविड सेंटरच्या माध्यमातून माणमधील ग्रामीण भागातील रुग्णांना 'आपले गाव आपले सरकार' प्रमाणे निश्चितच आधार मिळेल असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी व्यक्त केला. एचएसबीसी बँक व सिप्ला फाउंडेशनच्या आर्थिक सहयोगातून माणदेशी फाउंडेशनचे वतीने गोंदवले खुर्द येथे सर्व अधुनिक वैद्यकिय साधनासह उभारलेल्या कोविड सेंटरचे उद्घघाटन नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, प्रांताधिकारी शैलेंद्र सूर्यवंशी, माणदेशी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी, गटविकास अधिकारी संभाजीराव पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, माणदेशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा, विजय सिन्हा, डॉ.के.पी.कदम, डॉ.अमित पाटील, सरपंच अजय पोळ, अॅड. प्रभाकर कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते.



त्या पुढे म्हणाल्या की, माण-खटाव तालुक्यामधील ग्रामीण भागातील कोवीड बाधित रुग्णांची स्थानिक पातळीवर तातडीने मोफत उपचाराची सुविधा व्हावी म्हणून माणदेशी फाउंडेशनने गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर उभारलेले आहे. या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच रुग्णांवर उपचार करणारे तज्ञ डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी जिल्हा प्रशासन आणि माणदेशी यांच्या प्रयत्नातून नेमण्यात आले आहेत. 






श्री ब्रह्मचैतन्य महाराजांमुळे गोंदवले बुद्रुक प्रसिद्ध आहे. परंतु भविष्यात आरोग्य उपचारासाठी गोंदवले खुर्द प्रसिद्ध होईल. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा उभारून रुग्णांची अडचण दूर होणार असल्याने माझ्या आमदार फंडातून या सेंटरसाठी 12 लाख रुपये रुग्णवाहिकेसाठी देणार आहे. कोविडमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत होती. माझे कुटुंब माझी जबाबदारी तून रुग्णसंख्या कमी होण्यास मदत झाली आहे. कार्यक्रमास एचएसईबी बँकेच्या अलोका मुजुमदार यांनी या ऑनलाईनच्या माध्यमातून हजेरी लावली होती. व या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.




जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, माण तालुक्यात अत्याधुनिक सुविधायुक्त कोविड सेंटरमुळे खूप चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. भविष्यात लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे सेंटर खूप उपयोगी पडेल. कोरोना रुग्ण संख्या कमी होत असली तरी आपली जबाबदारी अजून संपलेली नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. कोविड रुग्णांना मानसिक आधार देणे महत्त्वाचे आहे. कोविड साथीत माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमाने श्रीमती चेतना सिन्हा व प्रभात सिन्हा यांनी सातारा येथील जम्बो कोविड हॉस्पिटलसाठी तसेच प्रशासनाच्या आरोग्य विभागासाठीही खुपच मोठे योगदान तेही वेळोवेळी रुग्णांच्या उपचारासाठी दिलेले आहे.

अलोका मुजुमदार म्हणाल्या, कोरोना काळात अत्यावश्यक तिथे मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांसाठी माणदेशी खूप चांगले काम करत आहे. चेतना सिन्हा म्हणाल्या, कोरोना काळात नुसते जीव वाचवायचे नाहीत तर रुग्णांचे हाल होता कामा नयेत यासाठी कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. हे कोविड केअर सेंटर तात्पुरते न राहता गंभीर रुग्णांसाठी याचा कायमस्वरूपी उपयोग होईल तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी माणदेशी कायम पुढाकार घेईल.




प्रभात सिन्हा यांनी प्रास्ताविकात माणदेशी फाऊंडेशनने कोविडच्या साथीत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी या कोविड सेंटरसाठी स्वतः हुन वेळ देणारे डॉ.अमित पाटील यांच्यासह रुग्णालयाचे कर्मचारी, डॉ.अमित पाटील, सरपंच कारंडे, डॉ.टी.एम. गायकवाड, व्ही.व्ही.गोरड, श्रीमती झिमल. परिचारिका माळी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांचा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

संपादन : अहमद मुल्ला,म्हसवड 



Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies