हाथरस बलात्कार घटनेतील आरोपीना ताबडतोब फाशीची शिक्षा द्या ; आटपाडी तालुका आरपीआयची निवेदनाद्वारे मागणी ; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा केला निषेध - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 3, 2020

हाथरस बलात्कार घटनेतील आरोपीना ताबडतोब फाशीची शिक्षा द्या ; आटपाडी तालुका आरपीआयची निवेदनाद्वारे मागणी ; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा केला निषेधहाथरस बलात्कार घटनेतील आरोपीना ताबडतोब फाशीची शिक्षा द्या ; आटपाडी तालुका आरपीआयची निवेदनाद्वारे मागणी ; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा केला निषेध 

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील दलित मुलीवर बलात्कार करून तिची जीभ कापून तिचा पाठीचा मणका निकामी करून तिच्या कुटुंबियांच्या परस्पर उत्तर प्रदेश पोलिस प्रशासनाने तिची मृतदेहाची विल्हेवाट लावली. याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांची चौकशी करून त्यांचेवर करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची तसेच सदर घटनेस जबाबदार असणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही आरोपीस मदत करण्याचेच काम केले असून त्यांचा ही आटपाडी तालुका आरपीआयच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला व सदरचे प्रकरणाचे निवेदन आटपाडी पोलीस ठाणेस देण्यात आले.


यावेळी बोलताना आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात म्हणाले. देशात दलितांवर अत्याचार वाढले आहेत. सदर गुन्हातील आरोपींना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पाठीशी घालत आहेत. त्यामुळे त्यांचा ही आरपीआयच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. तसेच अत्याचारीत पिडीत कुटुंबाना न्याय देण्यासाठी अॅट्रासिटी अॅक्टचे खटले फास्ट ट्रक न्यायालयात चालवावेत. पिडीतांना पोलिस संरक्षण दयावे. पिडीताच्या कुटुंबाचे पुर्नवसन व्हावे अशी आमची मागणी आहे.  


बलात्कार करून सदर तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही सदर पिडीत तरुणीच्या कुटुंबाला भेट देण्यास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा मज्जाव केला करणाऱ्या उत्तर प्रदेश सरकार पोलिसांचा ही ही जाहीर निषेध करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही राजीनामा दयावा, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटपाडी तालुकाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ही आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी दिला आहे.


सदरचे निवेदन आटपाडी पोलीस ठाणेचे पीएसआय अजितकुमार पाटील यांना देण्यात आले. यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात, आयटीसेलचे विशाल काटे, तालुका संघटक रणजित ऐवळे, मातोश्री बहुउद्देशिय संस्थेचे दत्तात्रय शेजाळ, दैनिक माणदेश एक्सप्रेसचे संपादक दिपक प्रक्षाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise