IPL 2020 : दिल्ली पॉइंट टेबलमध्ये नंबर 1 : राजस्थानची पराभवाची हॅट्रिक - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 10, 2020

IPL 2020 : दिल्ली पॉइंट टेबलमध्ये नंबर 1 : राजस्थानची पराभवाची हॅट्रिकIPL 2020 : दिल्ली पॉइंट टेबलमध्ये नंबर 1 : राजस्थानची पराभवाची हॅट्रिक  


शारजाह : आयपीएलमध्ये काल राजस्थानची पराभवाची हॅट्रिक झाली. दिल्लीने राजस्थानवर 'रॉयल' विजय मिळवत गुणतालिकेत प्रथम स्थान मिळवलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने दिलेलं 185 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ 19.4 षटकात 138 धावांवर माघारी परतला.


185 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात चांगली झाली. सलामीला आलेले यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी सुरुवातीला काही फटके मारण्याचा प्रयत्न केला. यशस्वी जयस्वाल 34 धावांवर तर बटलर 13 धावांवर माघारी परतले. त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, तोही 24 धावांवर बाद झाला. त्यानंतर राहुल तेवातिया वगळता कोणालाही दोन अंकी धावसंख्या उभारता आली नाही. दिल्लीकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक तीन गडी बाद केले. रविचंद्रन अश्विन आणि मार्कस स्टोइनीस यांनी प्रत्येकी दोन तर ऑनरीच नॉर्टजे, हर्षल पटेल आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक गडी बाद केला.


दिल्लीची सुरुवात खराब झाली. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हे दोघेही सलामीवीर लवकर माघारी परतले. आर्चरने धवनला 5 धावांवर तर पृथ्वी शॉला 19 धावांवर बाद. सलामीवीर बाद झाल्यावर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर डाव सावरतील असं वाटत असताना अय्यर 17 चेंडूत 22 धावावर यशस्वी जयस्वालने त्याला धावबाद केले. अय्यर बाद झाल्यानंतर ऋषभ पंतदेखील लगेचच धावबाद झाला. त्यानंतर मार्कस स्टॉयनीसने धमाकेदार खेळी केली. त्याने 4 षटकारांसह 30 चेंडूत 39 धावा जमवल्या. तर शिमरॉन हेटमायरनेही तुफान फलंदाजी केली. त्याने 24 चेंडूत 5 षटकारांच्या सहाय्यने 45 धावा केल्या. त्यानंतर अक्षर पटेलने शेवटी येऊन फटकेबाजी केली. अक्षरने 8 चेंडूत 17 धावांची खेळी करत संघाला 180 धावा उभारण्यात मदत केली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने टिच्चून गोलंदाजी करत केवळ 24 धावा देत 3 गडी बाद केले. तर कार्तिक त्यागी, अँड्र्यू टाई आणि राहुल तेवातिया यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise