IPL:2020 ; CSK vs SRH: हैदराबादची युवागिरी ; अनुभवी चेन्नईचा केले पराभव ; हैद्राबादचा सलग दुसरा विजय तर चेन्नईचा सलग तिसरा पराभव - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 2, 2020

IPL:2020 ; CSK vs SRH: हैदराबादची युवागिरी ; अनुभवी चेन्नईचा केले पराभव ; हैद्राबादचा सलग दुसरा विजय तर चेन्नईचा सलग तिसरा पराभव



IPL:2020 ; CSK vs SRH: हैदराबादची युवागिरी ; अनुभवी चेन्नईचा केले पराभव ; हैद्राबादचा सलग दुसरा विजय तर चेन्नईचा सलग तिसरा पराभव  


दुबई : : हैदराबाद च्या युवांनी आज युवागिरी  करत अनुभवी चेन्नईचा पराभव केला. हैद्राबादचा सलग दुसरा विजय तर चेन्नईचा सलग तिसरा पराभव ठरला.


हैदराबादच्या संघाने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हैदराबादला यावेळी पहिल्याच षटकात धक्का बसला. चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहारने यावेळी पहिल्याच षटकात हैदराबादच्या जॉनी बेअरस्टोला बाद केले. त्यामुळे हैदराबादला यावेळी चांगली सलामी देता आली नाही.


जॉनी बाद झाल्यावर काही वेळ कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांची जोडी जमली. पण चेन्नईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने मनीषला बाद केले आणि हैदराबादला दुसरा धक्का बसला. पांडे बाद झाल्यावर वॉर्नर आणि केन विल्यम्सन ही अनुभवी जोडी मैदानात होती. हैदराबादला या जोडीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण या जोडीला मोठी भागीदारी उभारता आली नाही.


पीयुष चावलाला मोठा फटका मारण्याच्या नादात वॉर्नर आऊट झाला, त्याला २८ धावा करता आल्या. वॉर्नर बाद झाल्यावर संघाची सर्व जबाबदारी केनवर आली होती. पण वॉर्नर बाद झाल्यावर दुसऱ्याच चेंडूवर केनही आऊट झाला. केनने यावेळी धावचीत होत आत्मघात केला. हे दोघेही बाद झाल्यावर हैदराबाद मोठी धावसंख्या उभारणार नाही, असे वाटत होते. पण यावेळी हैदराबादच्या युवा खेळाडूंनी संघाला आधार दिला.


प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा या युवा फलंदाजांनी यावेळी हैदराबादचा सावरले. त्याचबरोबर हैदराबादला वॉर्नर आणि केन बाद झाल्यावर सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. अभिषेक शर्माने यावेळी ३१ धावांची खेळी साकारली, त्या चहरने धोनीकरवी झेलबाद केला. पण अभिषेक बाद झाल्यावरही गर्गने धडाकेबाज फलंदाजी सुरुच ठेवली व आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादने चेन्नई समोर १६५ धावांचे आवाहन ठेवले.


चेन्नईची सुरुवात खराब झाली. शेन वॉटसन केवळ १ धाव काढून बाद झाला. त्यानंतर डू फ्लेसीने २२ धावांचे योगदान दिले. तो धावबाद झाला. रायडू व केदार जाधव हे अनुक्रमे ८ व ३ धावा काढून बाद झाल्याने चेन्नई ची अवस्था ४२ धावावर ४ अशी झाली. यानंतर फलंदाजीस आलेल्या रविंद्र जडेजा व कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी धावफलक हालता ठेवत फटकेबाजी सुरु केली. परंतु धावा व चेंडू यांच्यातील अंतर बरेच झाल्याने दबाव वाढतच होता. रविंद्र जडेजा ५० धावा काढून बाद झाला. तर महेंद्रसिंग धोनी ४७ व कुरण १५ धावावर नाबाद राहिले. हैद्राबाद संघाने हा सामना ७ धावांनी जिंकला व आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. तर चेन्नईचा हा सलग तिसरा पराभव झाला. हैद्राबादच्या प्रियाम गर्ग याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

  


No comments:

Post a Comment

Advertise