IPL 2020 : DC vs KKR ; शारजात श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉची वादळी खेळी ; केकेआरला दिले तब्बल २२९ धावांचे आवाहन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 3, 2020

IPL 2020 : DC vs KKR ; शारजात श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉची वादळी खेळी ; केकेआरला दिले तब्बल २२९ धावांचे आवाहनIPL 2020 : DC vs KKR ; शारजात श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉची वादळी खेळी ; केकेआरला दिले तब्बल २२९ धावांचे आवाहन


शारजाह : शाहजाह येथे होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि कोलकात नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यातल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स च्या फलंदाजांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करीत केकेआरलाच्या गोलंदाजांची धुलाई करत तब्बल २२८ धावा लुटल्या. यामध्ये  पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, आणि रिषभ पंत  यांनी तुफान फटकेबाजी केली.

 


KKRचा कर्णधार दिनेश कार्तिक यानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पृथ्वी आणि शिखर धवन यांनी DC ला पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून दिली. धवन 16 चेंडूंत 26 धावांवर माघारी परतल्यानंतर पृथ्वी आणि कर्णधार श्रेयस यांनी षटकारांचा वादळच आणलं. पृथ्वीनं यंदाच्या मोसमातील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्यानं 41 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून 66 धावा केल्या. त्यानंतर अय्यरने शारजाहच्या चहूबाजूंना चेंडू टोलवला. रिषभ पंतनेही तिसऱ्या विकेटसाठी श्रेयससह अर्धशतकी भागीदारी केली.


पंत 17 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचून 38 धावांत माघारी परतला. श्रेयसनं 38 चेंडूंत 7 चौकार व 6 षटकारांसह नाबाद 88 धावा केल्या. आंद्रे रसेलनं अखेरच्या षटकात एक विकेट घेत 7 धावा दिल्या. दिल्लीने 4 बाद 228 धावा चोपल्या.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise