Type Here to Get Search Results !

IPL 2020 : CSK vs SRH ; चेन्नई सुपर किंग्सची सनरायझर्स हैदराबादवर २० धावांनी मात



IPL 2020 : CSK vs SRH ; चेन्नई सुपर किंग्सची सनरायझर्स हैदराबादवर २० धावांनी मात  


दुबई : कमी धावा झाल्या असतानाही चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी अचूक मारा करीत सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळविला.


फॅफ ड्यू प्लेसिस आणि कुरन यांनी चेन्नईच्या डावाची सुरुवात केली. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संदीप शर्मानं CSK ला ड्यू प्लेसिसच्या (०) रुपानं पहिला धक्का दिला. कुरननं फटकेबाजी केली. संदीप शर्मानं त्याचा अडथळा दूर केला. कुरन २१ चेंडूंत ३१ धावांवर माघारी परतला. शेन वॉटसन आणि अंबाती रायुडू यांनी तिसऱ्या विकेटसाठई ८१ धावांची भागीदारी केली. खलील अहमदनं SRH ला यश मिळवून देताना रायुडूला (४१) बाद केले. पुढच्याच षटकात टी नटराजननं CSK ला आणखी एक धक्का दिला. वॉटसन ३८ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावा करून माघारी परतला. धोनी १३ चेडूंत २१ धावा करून माघारी परतला. रवींद्र जडेजानं १० चेंडूंत २५ धावा करताना चेन्नईला ६ बाद १६७ धावांचा पल्ला गाठून दिला.

 


धावांचा पाठलाग करताना SRHचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (९) व मनीष पांडे (४) हे लवकर माघारी परतले. सॅम कुरननं वॉर्नरचा अडथळा दूर केला, तर ड्वेन ब्राव्होनं पांडेला धावबाद केले. सलामी फलंदाज जॉनी बेअरस्टो व केन विलियम्सन यांनी हैदराबादचा डाव सावरला, परंतु रवींद्र जडेजानं SRH ला धक्का दिला. बेअरस्टो २३ धावांवर त्रिफळाचीत झाला. केन आज चांगल्या फॉर्मात दिसला आणि त्यानं चेन्नईच्या गोलंदाजांचा धैर्यानं सामना केला. आक्रमकतेपेक्षा त्याच्या फटक्यांमधल्या अचूक टायमिंगनं धोनीला हैराण केलं. त्यानं प्रियाम गर्गला सोबत घेऊन ४० धावा जोडल्या. कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर फटका मारण्याचा मोह गर्गला (१६) महागात पडला. रवींद्र जडेजानं त्याचा झेल टिपला.  



१८ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर चौकार मारून केननं इरादा स्पष्ट केला. मात्र, पुढच्याच चेंडूवर कर्ण शर्मानं त्याला शार्दूल ठाकूरकरवी झेलबाद केले. केननं ३९ चेंडूंत ७ चौकारांसह ५७ धावा केल्या. उरलेली कसर राशिद खाननं पूर्ण केली. कर्णच्या त्या षटकात १९ धावा आल्या. धोनीनं शार्दूल ठाकूरच्या हाती चेंडू सोपवला आणि १९ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्यानं राशिदला (१४) बाद केले. SRH ला ८ बाद १४७ धावाच करता आल्या आणि CSK ने २० धावांनी विजय मिळवला.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies