हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टोरंट व बार चालकांनी पर्यटन विभागाकडील मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 8, 2020

हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टोरंट व बार चालकांनी पर्यटन विभागाकडील मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरीहॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टोरंट व बार चालकांनी पर्यटन विभागाकडील मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली : सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील (outside containment zone) हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टोरंट व बार हे दि. 5 ऑक्टोबर पासून 50 टक्के क्षमतेसह सुरू राहतील. याकरिता पर्यटन विभागाकडून निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्गमित केले आहेत.


सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टोरंट व बार पुढील अटी व शर्तीच्या आधारे सुरू राहतील - सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील (outside containment zone) हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टोरंट व बार हे दि. 5 ऑक्टोबर पासून 50 टक्के क्षमतेसह सुरू राहतील. या आस्थापनांच्या व्यवस्थापकावर सदर आस्थापना विषयक मूळ नियम व कायदे लागू राहतील. हॉटेलमध्ये येणाऱ्या सर्व ग्राहकांची प्रवेशाव्दाराजवळ थर्मल स्क्रीनिंगव्दारे तपासणी करण्यात यावी. कोविड-19 संदर्भात लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात यावा. ताप सर्दी खोकला यासारखी लक्षणे असलेल्या ग्राहकांना हॉटेल मध्ये प्रवेश देवू नये. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने प्रत्येक ग्राहक / ग्रुप मधिल एकाचे नाव, संपर्क क्र, ई-मेल आयडी, दिनांक, वेळ इ. माहितीच्या नोंदी दररोज ठेवण्यात याव्यात. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार ग्राहकांची माहिती आरोग्य विभाग किंवा प्रशासनास देण्याबाबत त्यांची ना हरकत घेण्यात यावी. सदर आस्थापनांची सेवा देताना किंवा प्रतीक्षालय (Waiting Area) येथे सोशल डीस्टन्सींग (Social Distancing) चे नियमांचे पालन करावे. ग्राहकांनी मास्क परिधान केले असेल तरच त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात यावा. ग्राहकांनी हॉटेलमध्ये व हॉटेलच्या परिसरात असतना मास्क परिधान करणे बंधनकारक आहे (खानपाना व्यतिरिक्त).  


संबंधित आस्थापना चालकांनी ग्राहकांसाठी हॅन्ड सॅनिटायझर उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. हॅन्ड सॅनिटायझर ग्राहकांच्या वापराकरिता प्रतिक्षाकक्ष, प्रवेशव्दार इ. ठिकाणी ठेवण्यात यावे. आस्थापना चालकांनी ग्राहकांना शक्यतो डिजिटल माध्यमांव्दारे पेमेंट करण्यास प्रोत्साहन दयावे. रोख स्वरूपात पेमेंट घेताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कॅशिअर यांनी त्यांचे हात सतत निर्जंतुक करावेत. रेस्ट रूम आणि हात धुण्याच्या जागा (Wash Room) यांची वारंवार स्वच्छता करण्यात यावी व त्या जागा सॅनिटाईज कराव्यात. काऊंटर कॅशिअर आणि ग्राहकामध्ये शक्यतो प्लेक्सिग्लास स्क्रीन या सारखे बॅरीयर असावे. शक्य असल्यास प्रवेशासाठी व बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवावेत. शक्य असल्यास दारे, खिडक्या उघडी ठेवावीत व ए.सी. चा वापर टाळावा. ए.सी. वापरणे अनिवार्य असल्यास त्या यंत्रणेचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. शकय असल्यास पोर्टेबल हाय एफिशियंसी एयर क्लीनर बसवावेत. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असावी. सीसीटीव्ही रेकॉर्ड जतन करण्यात यावे. व्हॅलेट पार्कींग उपलब्ध असल्यास त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मास्क, ग्लोव्हज यांचा वापर करणे अनिवार्य आहे. डिस्पोजेबल मेनू कार्ड, क्यूआर कोड सारख्या माध्यमातून संपर्करहित मेनुकार्ड उपलब्ध करण्यात यावे. रीयुजेबल मेनू कार्ड ग्राहकांचे वापरानंतर निर्जंतुक करावे. डिस्पोजेबल मेनू कार्ड वापरानंतर त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी. कापडाच्या नॅपकीन ऐवजी चांगल्या प्रतीच्या डिस्पोजेबल पेपर नॅपकीनचा वापर करावा. सदर आस्थापनांनी दोन टेबल मधील अंतर कमीत कमी 1 मीटर असेल या प्रमाणे त्यांचे रचनेमध्ये योग्यते बदल करून घ्यावेत. ग्राहकांच्या मागणीनुसार बाह्यबाजू निर्जंतूक केलेली सीलबंद बाटलीतील पाणी अथवा फिल्टर केलेले पाणी ग्राहकांना उपलब्ध करून द्यावे. मेनू मध्ये फक्त शिजविलेल्या खादय पदार्थांचा समावेश करावा. शक्य असल्यास सलाड सारखे कच्चे पदार्थ, थंड पदार्थ टाळावेत. प्रत्येक ग्राहकांच्या वापरानंतर ग्राहक सर्विस एरियाचे निर्जुंतुकीकरण करण्यात यावे. फर्निचर, टेबल, खुर्च्या, बुफे टेबल, काऊंटर इ. जागांचे वेळोवेळी निर्जुंतुकीकरण करण्यात यावे. बुफे सेवेला परवानगी नाही. शक्य असेल तेथे मेनू मध्ये प्री प्लेटेड डिशेसना प्रोत्साहन द्यावे.


केवळ नेमून दिलेले कर्मचारी यांनीच संबंधित टेबल वर अन्न पदार्थ सर्व्ह करावे. प्लेट्स, चमचे आदी सर्व सेवा उपकरणे गरम पाण्यात व मान्यता प्राप्त जंतूनाशकाने धुवावीत. सेवा उपकरणे, वस्तू, भांडी ही वेगवेगळी आणि सॅनिटाईज केलेल्या कपाटात ठेवावीत. शक्य असलेस सेवा उपकरणे व अन्न पदार्थ गरम ठेवण्यासाठी वेगवेगळे वार्म्स असावेत. ग्राहकाने वापरलेले प्लेटस, चमचे, ग्लास इत्यादी सेवा उपकरणे तातडीने धुण्यासाठी धुण्याच्या जागे न्यावीत. शिल्लक राहिलेले अन्न हे संबंधित बकेटमध्ये जमा करावेत तसेच दररोज जमा होणा-या कच-याची दररोज विल्हेवाट लावावी. ग्राहकांनी हॅण्ड सॅनिटाईजरचा वापर करावा,  जेवणाव्यतिरिक्त माक्सचा वापर करावा अशा प्रकारचे पोस्टर्स आस्थापनाचे प्रवेशद्वाराजवळ लावावेत. ऑनलाईन ऑउटलेट असणाऱ्या आस्थापनांनी आस्थापना सुरू असण्याच्या वेळा, मास्कचा वापर, खाद्यपदार्थांची आगाऊ बुकींग, आगाऊ पेमेंट, डीलिवरी इत्यादीबाबत असणारे नियम/पॉलिसी यांची माहिती बेवसाईटवर, सोशल मिडीया इत्यादी माध्यमातून प्रसिद्ध करावी. करमणुकीचे लाईव्ह कार्यक्रम, वेंडींग व इतर गेम एरिया (including Billiards, darts and Video Games) इनडोअर व ऑउटाडोअर कार्ड रूम्स यांना परवानगी नाही. सर्व संबंधित आस्थापनांनी त्यांच्या सर्व कर्मचा-यांची नियमित कोविड -19 चाचणी करावी.  एन-95 किंवा त्याचदर्जाचा मास्क कर्मचाऱ्यांंनी वापरणे अनिवार्य आहे. आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांंनी त्यांचा गणवेश दररोज बदलणे अनिवार्य आहे. गणवेश व्यवस्थित सॅनिटाईज करावा.  दिवसातून दोन वेळा परिसराचे निर्जंतुकीकरण  करणेत यावे. सदर आस्थापनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांचे कामाच्या ठिकाणी आल्यावर थर्मल स्कीनिक करावे.  सर्व कर्मचाऱ्यांंनी त्यांच्या आरोग्याची स्वत: काळजी घ्यावी.  तसेच काविड-19 संदर्भात काही लक्षणे दिसून आल्यास तात्काळ कोविड-19 हेल्पलाईन वर वैद्यकीय उपाचाराकरीता संपर्क साधावा. ग्राहकांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो जागेचे पूर्व आरक्षण करावे.  ग्राहकांनी प्रतिक्षालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. सदर आस्थापनाने सामाजिक अंतर पाळण्याच्या दृष्टीने आवश्यक तेथे फरशीवर मार्कींग करून घ्याव्यात.


गर्दी टाळण्यासाठी हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट व बार यांचे क्षमतेनूसार ग्राहकांना प्रवेश द्यावा. सदर आस्थापना चालकांनी त्यांच्या कमर्चा-यांना कोविड -19 प्रसार रोखण्यासाठी घ्यावयाच्या दक्षता, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, वैयक्तीक स्वच्छता, खाद्पदार्थ तयार करताना घ्यावयाची दक्षता, स्वच्छता व निर्जंतुकीकरण  इत्यादी बाबत प्रशिक्षण द्यावे. किचन एरिया वारंवार सॅनिटाईज करण्यात यावा. सदर आस्थापनांच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी यांनी मास्क, ग्लोव्हज, शेफकॅप / नेटकॅप,  फेसशिल्ड अशा सुरक्षा साधनांचा वापर करणे अनिवार्य आहे.  सदर आस्थापनांनी HAACP/ ISO/ FSSAI यांचे स्वच्छता (Sanitization & Hygiene) बाबतचे निकष व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पणे पालन करावे.  सदर आस्थापनांनी त्यांचेकडे जमा होणारा ओला, सुका, बायोडीग्रेडेबल इ. कचऱ्यांंचे योग्य व्यवस्थापन करावे.  ग्लोव्हज, मास्क इ. चे स्वतंत्रपणे व्यवस्थापन करावे.


वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शन सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट व बार सुरु ठेवताना कोविड-19 प्रतिबंध उपाय योजना करण्याकरिता सोबत जोडलेल्या शासनाकडील पर्यटन मंत्रालयाने सदर बाबत प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. सदर आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.


या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise