हाथरस बलात्कार घटना : पोलीस अधीक्षकांसह सात जणांचं निलंबन ; पीडित कुटुंबीय आणि आरोपींची नार्को टेस्ट होणार ; मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 2, 2020

हाथरस बलात्कार घटना : पोलीस अधीक्षकांसह सात जणांचं निलंबन ; पीडित कुटुंबीय आणि आरोपींची नार्को टेस्ट होणार ; मुख्यमंत्री आदित्यनाथ योगीहाथरस बलात्कार घटना :  पोलीस अधीक्षकांसह सात जणांचं निलंबन ; पीडित कुटुंबीय आणि आरोपींची नार्को टेस्ट होणार ; मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी  


हाथरस : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर सिंह, क्षेत्राधिकारी (सीओ) राम शब्द, पोलीस निरीक्षक दिनेश कुमार वर्मा, उपनिरीक्षक जगवीर सिंग आणि महेश पाल यांना निलंबित करण्यात आले आहे. हाथरस प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई केली आहे. तसेच दोन्ही पक्षांची (पीडित आणि आरोपी) नार्को टेस्ट केली जाणार आहे.


त्याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेबाबत ट्वीट करत, उत्तर प्रदेशातील माता-भगिनींचा सन्मान आणि स्वाभिमानाला हानी पोहण्याची कल्पना करणाऱ्यांचा विनाश निश्चित आहे. अशांना अशी शिक्षा मिळेल जी भविष्यात एक उदाहरण ठरेल. उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक माता-भगिनींच्या सुरक्षा आणि विकासासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आणि वचन असल्याचे म्हणाले होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise