हाथरस प्रकरणी नराधम आरोपींना फाशी द्यावी : माळशिरस तालुका रिपाइंच्या वतीने प्रशासनाला निवेदन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, October 5, 2020

हाथरस प्रकरणी नराधम आरोपींना फाशी द्यावी : माळशिरस तालुका रिपाइंच्या वतीने प्रशासनाला निवेदनहाथरस प्रकरणी नराधम आरोपींना फाशी द्यावी : माळशिरस तालुका रिपाइंच्या वतीने प्रशासनाला निवेदन

माणदेश एक्सप्रेस टीम


सदाशिवनगर/प्रतिनिधी : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेच्या निषेध करून यातील नराधम आरोपींना मरेपर्यंत फाशी देण्यात यावी, पिडीत मुलीच्या कुटुंबीयाना उत्तर प्रदेश सरकारने आर्थिक मदत तात्काळ द्यावी, अत्याचार प्रकरण खटला जलदगती न्यायालयात चालवावा, स्थानिक प्रशासनाची चौकशी करावी, अशा मागण्याचे निवेदन माळशिरस तालुका आरपीआयच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले असून निवेदनाची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला.  


यावेळी प.म. सचिव एन.के. साळवे, जि.युवा.कार्याध्यक्ष किरण धाईंजे, जि.उपाध्यक्ष नितिन मोरे, तालुका अध्यक्ष प्रा.नरेंद्र भोसले, तालुका सरचिटणीस मिलिंद सरतापे, तालुका कार्याध्यक्ष मारूती खांडेकर, अजित मोरे, आयटीसेल प्रमुख प्रविण साळवे, एस.एम.गायकवाड, दशरथ नवगिरे, संजय भोसले, संतोष चंदनशिवे, बाबुराव भोसले, प्रकाश गायकवाड, संतोष कांबळे, रविंद्र लोंढे, राजरत्न नाईकनवरे, अभिजीत वाघमारे, विश्वजित भालशंकर, प्रकाश कांबळे, दिपक दळवी, समाधान भोसले, राहुल धाईंजे, अवधुत कांबळे, महादेव सावंत, माऊली सुरवसे, संजय दळवी, संतोष घाडगे, आप्पा नरळे, अशोक गोसावी, सागर भोसले, संतोष गायकवाड, उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise