कोरोना रुग्णांसाठी आता खुशखबर : अल्प दरात रेमडिसेव्हिर इंजेक्शन उपलब्ध - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 15, 2020

कोरोना रुग्णांसाठी आता खुशखबर : अल्प दरात रेमडिसेव्हिर इंजेक्शन उपलब्ध

 


कोरोना रुग्णांसाठी आता खुशखबर : अल्प दरात रेमडिसेव्हिर इंजेक्शन उपलब्ध 


पुणे : गेल्या काही महिन्यांपासून अनेकांच्या जीवाशी खेळत असलेला कोरोना व्हायरस आता काहीसा आटोक्यात आला आहे मात्र अजूनही पूर्णपणे तो नाहीसा झालेला नाही. परंतु शासनाने बऱ्याच सुखसोयी उपलब्ध केल्या असून आता खासगी रुग्णालयांतील रुग्णांना निश्चित व अल्प दरात रेमडिसेव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक औषध दुकान निश्चित करण्यात आले आहे. राज्यात एकुण ५९ दुकाने निश्चित करण्यात आली असून त्यामध्ये २ हजार ३६० रुपयांना एक इंजेक्शन मिळणार आहे.मध्यम व तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना रेमडिसेव्हिर हे इंजेक्शन दिले जाते. मात्र, या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने मागील महिन्यांत प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत होती. संपुर्ण राज्यातच ही स्थिती निर्माण झाल्याने रुग्णांना वेळेत इंजेक्शन मिळत नव्हते. आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे. पण इंजेक्शनची किंमत जास्त असल्याने खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.यापार्श्वभुमीवर आरोग्य विभागाने इंजेक्शन अल्प दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या दरात इंजेक्शन मिळण्याची दुकानेही निश्चित करण्यात आली आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे यावर नियंत्रण राहणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांकडून जिल्ह्याची दैनिक गरजेनुसार आरोग्य विभागाकडे मागणी केल्यानंतर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाईल. या योजनेतील उत्पादक कंपन्यांकडून दररोज ५ हजार इंजेक्शन देण्यात येणार आहेत. खासगी रुग्णालयांना जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांकडे रुग्णांच्या माहितीसह इंजेक्शनची मागणी करावी लागेल. रुग्णाला गरज आहे की नाही, हे पाहिल्यानंतर त्याला मान्यता दिली जाईल. त्यानंतर संबंधित औषध दुकानांमध्ये इंजेक्शन मिळेल. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी संबंधित विभागांना आदेश दिले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


 

No comments:

Post a Comment

Advertise