बिहारमध्ये मोफत लस मग उर्वरित भारत काय बांग्लादेश की पाकिस्तानात? : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, October 25, 2020

बिहारमध्ये मोफत लस मग उर्वरित भारत काय बांग्लादेश की पाकिस्तानात? : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोलबिहारमध्ये मोफत लस मग उर्वरित भारत काय बांग्लादेश की पाकिस्तानात? : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल


मुंबई : बिहारमध्ये मोफत लस मग उर्वरित भारत काय बांग्लादेशात आहे का?  असा प्रश्न करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ऑनलाईन जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या अनेक प्रश्नांची जोरदार उत्तरे दिली असून भाजपचा सगळा हिशोबच त्यांची चुकता केला आहे.


यावेळी बोलताना ते म्हणाले, आज मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला दसरामेळावा आहे. या मेळाव्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुफान महासागर लोटला असता. मला खात्री आहे तो तुफान महासागर, त्या लाटा इथपर्यंत आल्या नसल्या तरी तो महाराष्ट्रामध्ये उचंबळून, उसळून हा सोहळा बघतोय, अशी सुरुवात उद्धव ठाकरे यांनी केली.


पुढच्या महिन्यात एक वर्ष होतंच आहे. तारीख पे तारीख देत आहेत, देऊ द्यात. मी ज्यावेळी मुख्यमंत्रीपदी बसून कारभाराला सुरुवात केली, त्या दिवसापासून अनेक जणं स्वप्न बघत आहेत की हे सरकार पडेल, सरकार पाडू. तेव्हा दिलेलं आव्हान मी आज सुद्धा देतोय, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा! आम्ही गुळाला चिकटलेले मुंगळे नाहीत. महाराष्ट्र हा लेच्या पेच्यांचा प्रदेश नाही, हे वाघांचं राज्य आहे. जो महाराष्ट्रच्या आडवा येईल त्याला आडवा पाडून गुडी उभी करणार असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

No comments:

Post a Comment

Advertise