अतिवृष्टीने घरांचे नुकसान झालेल्यांना अनिलशेठ पाटील यांच्याकडून आर्थिक मदत - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 2, 2020

अतिवृष्टीने घरांचे नुकसान झालेल्यांना अनिलशेठ पाटील यांच्याकडून आर्थिक मदतअतिवृष्टीने घरांचे नुकसान झालेल्यांना अनिलशेठ पाटील यांच्याकडून आर्थिक मदत 

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/धिरज प्रक्षाळे : गेल्या १५ दिवसापूर्वी आटपाडी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले होते. यामध्ये रस्ते, पुल वाहून जाण्याबरोबरच गरिबांच्या घरांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक घरांची पडझड झाली होती. याच अतिवृष्टीचे व पडझड झालेल्या घरांची आटपाडी तालुक्याचे युवा नेते अनिलशेठ पाटील यांनी पहाणी दौरा करून ज्या गरीब लोकांच्या घरांची पडझड झाली आहे त्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती.  


आटपाडी तालुक्यातील भगवान निवृत्ती साळुंखे, विठ्ठल बाबासो जुगदर आणि भीमराव चंद्रकांत पवार यांच्या घरांची अतिवृष्टीमुळे मोठी पडझड झाली होती. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने डोक्याला हात लावून बसण्याशिवाय त्यांना पर्यायच राहिला नव्हता. परंतु अनिलशेठ पाटील यांनी आटपाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दत्तात्रय पाटील (पंच) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भगवान निवृत्ती साळुंखे, विठ्ठल बाबासो जुगदर आणि भीमराव चंद्रकांत पवार यांना आर्थिक मदत प्रदान केली.


यावेळी अनिलशेठ पाटील, दादासो पाटील, आवळाईचे नवनाथ साळुंखे, सिद्धनाथ साळुंखे, नितीन चव्हाण व मान्यवर उपस्थित होते. आर्थिक परिस्थितीची हलाखीची असल्याने मिळालेली मदत ही लाखमोलाची असल्याची भावना यावेळी भगवान निवृत्ती साळुंखे, विठ्ठल बाबासो जुगदर आणि भीमराव चंद्रकांत पवार यांनी व्यक्त केली.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise