हाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करा व मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावं : 'या' शिवसेना आमदाराची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 2, 2020

हाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करा व मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावं : 'या' शिवसेना आमदाराची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणीहाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करा व मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावं : 'या' शिवसेना आमदाराची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी  


मुंबई : हाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करा व मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी केली आहे.


14 सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये १९ वर्षीय दलित तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आले. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली. एकीकडे पाशवी अत्याचारानंतर तरुणीच्या मृत्यूनंतरही विटंबना सुरुच होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी रात्रीतच कुटुंबीयांना न सांगता तरुणीवर अंत्यसंस्कार केले. यानंतर बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना यूपी पोलिसांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे उत्तर प्रदेशचं योगी सरकार आणि यूपी पोलीस नेमकं काय लपवत आहेत, असा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांकडून उपस्थित केला जात आहे.


त्याच अनुषंगाने शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी हाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांना तपासासाठी उत्तर प्रदेशला पाठवावं, अशी मागणी केली. सरनाईक म्हणाले की, "जर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बिहार पोलीस गुन्हा दाखल करुन मुंबईत येऊ शकतात, मग हाथरस प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन करावा, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे. गृहमंत्र्यांनी ताबडतोब यावर कारवाई करावी, अशी विनंती मी करतो."प्रताप सरनाईक यांचं ट्वीट

देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबादारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसतेय. मुंबईत यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे अशी विनंती मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना करतो, असं सरनाईक यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise