निकृष्ट रस्त्या बाबत चुकीचा अहवाल ; बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता विरुद्ध कडक कारवाई करण्याची माजी उपसभापती अशोक माळी यांची अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 1, 2020

निकृष्ट रस्त्या बाबत चुकीचा अहवाल ; बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता विरुद्ध कडक कारवाई करण्याची माजी उपसभापती अशोक माळी यांची अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रारनिकृष्ट रस्त्या बाबत चुकीचा अहवाल ; बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता विरुद्ध कडक कारवाई करण्याची माजी उपसभापती अशोक माळी यांची अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रार 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी : मौजे मापटेमळा ता. आटपाडी, जि. सांगली येथील रस्त्याबाबत निकृष्ट काम केल्याबद्दल तक्रार असतानाही आटपाडी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडील शाखा अभियंता यांनी जाणीवपूर्वक खोटा अहवाल तयार करून सदरचा रस्ता चागला असल्याचा अहवाल दिल्याने संबंधित बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी व कार्यकारी बांधकाम अभियंता जि.प. सांगली यांना आटपाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती ‘विक्रमवीर’ अशोक माळी यांनी दिले आहे.


मौजे मापटेमळा ग्रामपंचायत येथील रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत अशोक माळी यांनी तक्रार केली होती. त्यानुसार बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांना सदर रस्त्याच्या कामाबाबत पाहणी करून अहवाल देण्याचे गटविकास अधिकारी यांनी आदेश दिले होते. परंतु बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता यांनी सदर रस्त्यावरील खड्डे मुजविले असून इतर काम केले आहे. असे खोटे भासवून खोटा अहवाल तयार करून गटविकास अधिकारी यांची ही फसवणूक केल्याचे अशोक माळी यांनी तक्रारीत नमूद केले आहे.


तरी सदर निकृष्ट रस्त्याची आपण स्वत: पाहणी करून खोटा अहवाल देणाऱ्या बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तसेच सदर प्रकरणी विस्तार अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले असतानाही त्यांनी ही या कामाबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ केली असून चौकशी प्रलंबित ठेवली आहे. त्यामुळे शाखा अभियंता यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अशोक माळी यांनी केली आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise