खानापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा ; भटके विमुक्त विकास मंचची निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे मागणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, October 14, 2020

खानापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा ; भटके विमुक्त विकास मंचची निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे मागणीखानापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा ; भटके विमुक्त विकास मंचची निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे मागणी 

माणदेश एक्सप्रेस टीम  


विटा : खानापूर तालुक्यात ओला दूष्काळ जाहीर करावा अशी मागणी भटके विमुक्त विकास मंच, खानापूर तालुका शाखेच्या वतीनेकडून करण्यात आली आहे.  
राज्यात सर्वत्र परतीच्या पावसामुळे हाहाकार माजला आहे. सगळीकडे अतिवृष्टीमुळे जीवीतहानी, शेती, घरे, रस्ते, पूल, नालाबांध, पशूधन व इतर अनेक घटकांचे अपरिमीत असे नूकसान झाले आहे. अगोदरच कोवीड लॉकडाउनमूळे गेले ७ महिने जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यात भर म्हणून की ही अतिवृष्टी म्हणजे  “दुष्काळात तेरावा”.  


सध्या या दोन्ही संकटामुळे सामान्याची अवस्था खूप बिकट झाली आहे. यातून सावरण्यासाठी शासनाने यूध्दपातळीवर प्रयत्न केले पाहिजेत, तरच  काही दिवसांत परिस्थिती स्थिर होऊ शकते. नाहीतर याचे भयंकर परिणाम भावी काळात जाणवू शकतात. त्यामुळेच खानापूर तालुक्यातील भटके विमुक्त विकास मंचच्या वतीने , संपूर्ण तालूक्यात सद्यस्थितीचि आढावा घेऊन व तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत. अतिवृष्टीग्रस्तांना भरपाई देण्यात यावी. तसेच खानापूर तालुक्यात ओला दूष्काळ जाहीर करावा. अशा मागणीचे निवेदन खानापूरचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांचेकडे करण्यात आली आहे. यावेळी किशोर राठोड, उपूल बुधावले, अमोल मंडले, प्रशांत पाटोळे, सोनू जाधव, दशरथ चव्हाण, आप्पासाहेब माने आदि कार्यकर्ते उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise