Type Here to Get Search Results !

योजना माडगुळे प्रादेशिक पिण्याची पाण्याची, त्रास मात्र आटपाडीतील नागरिकांना : राजेंद्र खरात ; अन्यथा आंदोलन करणार



योजना माडगुळे प्रादेशिक पिण्याची पाण्याची, त्रास मात्र आटपाडीतील नागरिकांना : राजेंद्र खरात ; अन्यथा आंदोलन करणार  

माणदेश एक्सप्रेस टीम



आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील शेटफळे चौक ते बस स्थानक रोड वरती असणाऱ्या मंगलमुर्ती मॉल समोर रस्त्याच्या एका बाजूला असणारी माडगुळे प्रादेशिक पाणी योजनेची पाईप-लाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून या वाया जाणाऱ्या पाण्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांबरोबरच वाहन धारकांना होत असल्याने सदरची पाण्याची पाईप-लाईन दुरुस्ती करावी अशी मागणी आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केली आहे.




आटपाडी शेटफळे चौकात बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला पाईप-लाईन फुटल्याने या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला आहे. यातून वाहणाऱ्या पाण्याचा त्रास या ठिकाणी राहणारे स्थानिक रहिवाशी यांना होत असून दिवसभर पाणी या ठिकाणी वाहत असल्याने दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावरून चालत जाणाऱ्या नागरिकांना यांना याच पाण्यातून चालत जावावे लागत आहे. तर याचवेळी चारचाकी व दुचाकी वाहन बाजूने गेल्यास पाणी चालत जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर येत असल्याने अनेक वेळा ‘हातघाईचे’ प्रसंग घडलेले असून मोठ्या प्रमाणात वाद उद्भवले आहेत. 




याबाबत येथील स्थानिक रहिवाशी यांनी ग्रामपंचायतकडे पाठपुरावा केल्यानंतर सदर फुटलेली पाईप-लाईन ही आटपाडी ग्रामपंचायतीची नसल्याने सांगितले नागरिकांनी आटपाडी तालुका आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्याकडे याबाबत तक्रार केली. याबाबत त्यांनी आटपाडी पंचायत समितीकडील शाखा अभियंता राठोड यांच्याकडे याबाबत तक्रार केली असून फुटलेली पाण्याची पाईप-लाईन तात्काळ दुरुस्त करावी अन्यथा आटपाडी पंचायत समितीची विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.



Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies