म्हसवड परिसरातील नागरिकांनी वादळी वारे व पाऊस यापासून सुरक्षित रहा : युवराज सूर्यवंशी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, October 14, 2020

म्हसवड परिसरातील नागरिकांनी वादळी वारे व पाऊस यापासून सुरक्षित रहा : युवराज सूर्यवंशी

युवराज सुर्यवंशी


म्हसवड परिसरातील नागरिकांनी वादळी वारे व पाऊस यापासून सुरक्षित रहा : युवराज सूर्यवंशी 

माणदेश एक्सप्रेस टीम  


म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड परीसरामध्ये असणाऱ्या नागरिकांनी वादळी वारा व मुसळधार पाऊस यापासून सावध व सुरक्षित राहण्याचे आवाहन म्हसवड राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष युवराज सुर्यवंशी यांनी माणदेश एक्सप्रेसच्या माध्यामातून केले आहे.
म्हसवड नगरपरिषद व परिसरातील नागरिकांना संभाव्य वादळी वारा व मुसळधार पाऊस यापासून कोणतीही जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी प्रशासनाच्या सर्व सूचनेचे पालन करा व गरज असेल तरच घराबाहेर पडा. जुनी धाब्याची घरे, नदी-नाले, पाणी, इलेक्ट्रिक पोल, इलेक्ट्रिक वस्तू यापासून सावध राहा. तसेच स्वत:च्या परिवाराची काळजी घ्यावी. तसेच मदतीची गरज भासल्यास युवराज सूर्यवंशी (अध्यक्ष म्हसवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) मोबाईल क्रमांक 9423225688  व सौ. स्नेहल सूर्यवंशी ( उपनगराध्यक्षा म्हसवड न.पा.) 9404407301 या क्रमांकावरी संपर्क साधण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise