लॉकडाउनबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा : कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाउन कायम - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, October 27, 2020

लॉकडाउनबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा : कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाउन कायम


 लॉकडाउनबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा : कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाउन कायम 

वी दिल्ली : लॉकडाउनबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये म्हणजेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाउन ३० नोव्हेंबरपर्यंत कायम राहिल असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेक गोष्टींना केंद्र सरकारने नियम आणि अटींसह संमती दिली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाउन कायम असणार आहे असं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.देशभरात मार्च महिन्यापासून लॉकडाउन सुरु करण्यात आला. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत हळूहळू अनेक गोष्टींना संमती देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसतो आहे. भारतातील कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येत वाढ झाली असली तरीही कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. एवढंच नाही तर पॉझिटिव्ह केसेसच्या संख्येतही घट झाली आहे. असं असलं तरीही संपूर्ण काळजी घेऊनच जिम, रेस्टोरंट, हॉटेल्स हे सगळं उघडण्यास केंद्र सरकारने संमती दिली आहे. अशात कोरोना कंटेन्मेंट झोन म्हणजेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाउन पूर्वीप्रमाणेच असेल आणि ३० नोव्हेंबरपर्यंत तो असेल असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise