आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न ; रुग्णांना फळे वाटप - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 1, 2020

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न ; रुग्णांना फळे वाटपआमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न ; रुग्णांना फळे वाटप

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी :  भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर व रुग्णांना फळे वाटप करून साजरा करण्यात आला.


वाढदिवसानिमित्त आटपाडी प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयाच्या सभागृहात रक्तदान शिबिर संपन्न झाले. याला चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदचे माजी समाजकल्याण सभापती व विद्यमान जि.प. सदस्य ब्रह्मानंद पडळकर, आटपाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य तानाजी यमगर, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान सदस्य यु.टी. जाधव, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विष्णुपंत अर्जुन, जयवंत सरगर यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.


आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोरनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन लोकउपयोगी कार्यक्रम आयोजित करून वाढदिवस साजरा केला. तर कार्यकर्त्यांनी सांगली, सातारा, सोलापूर व मिरज येथे रक्तदान शिबिर आयोजित करून वाढदिवस साजरा केला.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise