धक्कादायक प्रकार ; गर्भवती महिलेला विवस्त्र करून मारहाण ; आरोपी फरार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 29, 2020

धक्कादायक प्रकार ; गर्भवती महिलेला विवस्त्र करून मारहाण ; आरोपी फरारधक्कादायक प्रकार ; गर्भवती महिलेला विवस्त्र करून मारहाण ; आरोपी फरार

माणदेश एक्सप्रेस टीमम्हसवड : दिराबरोबर शेजारी राहणाऱ्या मुलीस पळून जाण्यास मदत केल्याचा राग मनात धरून मुलीच्या घरच्यांनी खडकी पाटोळे ता. माण येथील २७ वर्षीय विवाहित गर्भवती महिलेस विवस्त्र करून मारहाण करून विनयभंग केल्याची घटना घडली असून सदर महिलेने सहा जणांच्या विरोधात म्हसवड पोलिसात तक्रार दिली असून या घटनेतील संशयित आरोपी फरारी झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सदर महिला खडकी-पाटोळे (ता.माण) येथे मुलगी व सासू सासरे यांच्याबरोबर राहते. तर तिचे पती हे नोकरीनिमित्त पुण्यात राहतात. ते मधून अधून घरी येतात .सदर महिलेच्या घरा शेजारीच संजय श्रीरंग तुपे हे त्यांचे कुटूबियांसोबत राहणेस आहेत. तसेच सदर महिला ही तीन महिन्याची गर्भवती आहे. सदर महिलेचा दीर अविनाश बापुराव साळुंखे याने संजय श्रीरंग तुपे यांची मुलगी रेश्मा हिच्याशी एक महिन्यापुर्वी पळून जावुन प्रेमविवाह केला आहे. त्या कारणाने संजय श्रीरंग तुपे व त्यांच्या कुटूंबातिल लोक सदर महिला व तिच्या कुटूबियांना वारवार घालुन पाडुन शिवीगाळ करत असतात.


ता.२५ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास सदर महिला घरी जेवणखाण करुन भांडी घासणेकरिता घराचे बाहेर गेले असता तिच्या शेजारी राहणारे मिनाक्षी संजय तुपे, साकरुबाई विष्णु तुपे, कल्पना आण्णा तुपे, संतोष विष्णु तुपे, संजय श्रीरंग तुपे, आण्णा श्रीरंग तुपे हे सर्वजण घरासमोर आले व "आमच्या पोरीला तु पळवून न्यायला मदत केलीस तुला आता सोडणार नाही, तुझ्या पोटातील बाळ आता येवू देणार नाही" असे म्हणुन सदर महिलेस त्यांचे पैकी मिनाक्षी श्रीरंग तुपे हिने त्या महिलेचा डावा हात धरुन ओढले. त्यामुळे ती महिला तोल जावुन मी खाली पडली. तेवढ्यात साखरुबाई तुपे, कल्पना तुपे, संतोष तुपे, संजय तुपे, आण्णा तुपे या सर्वानी सदर महिलेस शिवीगाळ करत हाताने जोरजोराने मारहाण करणेस सुरवात केली. सदर महिला खाली पडलेने मोठमोठ्याने ओरडत होती. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकुन तिचा घराशेजारी असणारे कलावती दत्तु सांळुखे, सुरेखा दादा सांळुखे या दोघी पळत आल्या व भांडणे सोडविण्याचा प्रयत्न करु लागल्या असता त्या दोघीनाही वरिल सर्वानी "तुम्ही या ठिकाणी थांबायचे नाही" असे म्हणाल्याने त्या दोघी तेथुन निघुन गेल्या.
त्यानंतर साकरुबाई व कल्पना या दोघीनी "तुझे दीर मोहन मोतीराम सांळुखे हे वालुबाईच्या शिवारात शेळ्या राखत आहेत तरी आपण त्यांचेकडे जावुन झालेल्या प्रकाराबाबत सविस्तर बोलु " असे म्हणाल्या त्यामुळे सदर महिलेने त्यांचेवर विश्वास ठेवून त्यांचेसोबत निघुन गेली. साधारण दुपारी एकचे सुमारास सर्वजण वालुबाईच्या शिवाराजवळ पोहोचलो. त्याठिकाणी सदर महिलेचे दीर मोहन यांचेसोबत झाल्या प्रकाराबाबत चर्चा केली. त्यानंतर सदर महिलेस तहान लागल्याने ती तेथे जवळच असलेल्या पाण्याच्या झऱ्यावर पाणी पिणेकरिता जात असताना काही अंतरावर गेल्यावर साकरुबाई विष्णु तुपे, कल्पना आण्णा तुपे, मिनाक्षी संजय तुपे त्या तिघीनी तिला हाताने ओढत "हिला आता सोडायची नाही" असे म्हणत डोंगरावरती खेचत नेले. त्यानंतर साकरुबाई व मिनाक्षी यांनी सदर महिलेस पूर्ण नग्न करुन हाताने लाथाबुक्यानी मारायला सुरवात केली. तेथे समोरच उभे असलेले संजय श्रीरंग तुपे, संतोष विष्णु तुपे, आण्णा श्रीरंग तुपे यांना कल्पना साकरुबाई व मिनाक्षी या त्यांना म्हणाल्या की "हिला अशीच नग्न बघा" असे म्हणत सर्वजण तेथेच थांबले.व "कोण हिला मदत करते ते बघुया हिला अशीच गावातुन नग्न अवस्थेत फिरवायची आहे," असे म्हणत ते सर्वजण तेथेच थांबले.तसेच झालेल्या या झटापटीत सदर महिलेच्या गळयातील दीड तोळ्याचे सोन्याचे मणीमंगळसुत्र तुटून कोठेतरी गहाळ झालेले आहे.अंगावरती कपडे नसल्याने सदर महिला जोरजोराने मदतीसाठी ओरडत होती. ओरडण्याच्या आवाजाने तेथे जवळच शेतात काम करत असलेले तिचे चुलत दीर जनार्दन संदिपान सांळुखे व जानुबाई, बालिका जनार्दन सांळुखे, महादेव गणपत सांळुखे हे तेथे आले व बालिका हिने सदर महिलेस कपडे आणुन दिले त्यानंतर त्या महिलेने कपडे घातले  व तेथे जवळच थांबलेले संजय श्रीरंग तुपे, संतोष विष्णु तुपे, आण्णा श्रीरंग तुपे यांना कल्पना, साकरुबाई व मिनाक्षी यांनी सदर महिलेच्या मदतीकरिता तेथे आलेले जनार्दन संदिपान साळुंखे  व जावुबाई बालिका जनार्दन सांळुखे, महादेव गणपत सांळुखे यांचेशी शिवीगाळ करत तुम्ही हिला मदत करु नका असे म्हणत वरिल सर्वजण तेथुन निघुन गेले.त्यानंतर सदर महिलेने मिनाक्षी संजय तुपे, साकरुबाई विष्णु तुपे, कल्पना आण्णा तुपे, संतोष विष्णु तुपे, संजय श्रीरंग तुपे, आण्णा श्रीरंग तुपे (सर्व राहणार खडकी पाटोळे) यांचेविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise