Type Here to Get Search Results !

शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष संचालकपदी आटपाडीचे डॉ.एम.एस. देशमुख



शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष संचालकपदी  आटपाडीचे डॉ.एम.एस. देशमुख 

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी :  शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष संचालकपदी डॉ.एम.एस. देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. देशमुख हे विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. विद्यापीठात २०१३ पासून ते कार्यरत आहेत. विद्यापीठातील यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या मास्टर ऑफ रुरल स्टडीज एमआरएस या अभ्यासक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहतात. 


यापूर्वी देशमुख यांनी सौमय्या कॉलेज घाटकोपर येथे १९९६ ते २०१३ या कालावधीत प्राध्यापक होते. या कॉलेजमध्ये त्यांनी वेगवेगळया कमिटीवर काम केले आहे. त्या दरम्यान ते मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून काम केले आहे. तसेच सध्या मुंबई विद्यापीठाच्या ग्रामीण विकास विभागाच्या ‘आरसीसी’ कमिटीवर आहेत.


शिवाय सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या विविध कमिट्यावर काम करत आहेत. विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातील कन्सल्टंन्सी प्रोजेक्टवर सहसमन्वयक प्रमुख सक्रिय आहेत. डॉ. देशमुख हे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील आहेत.


दरम्यान विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षामार्फत ‘नॅक’ मूल्यांकनाच्या तयारीचे काम होते. यापूर्वी विद्यापीठ गुणवत्ता हमी कक्ष संचालकपदी डॉ.आर.के. कामत व नॅनो टेक्नॉलॉजी विभागाचे डॉ. पी.एस. पाटील यांनी काम केले आहे. प्रा.पाटील यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर, कुलगुरू डॉ. डी.टी.शिर्के यांनी डॉ. देशमुख यांची नियुक्ती केली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies