Type Here to Get Search Results !

भाजपला दुसरा धक्का : सहयोगी आमदार यांचा होणार शिवसेनेत प्रवेश



 भाजपला दुसरा धक्का : सहयोगी आमदार यांचा होणार शिवसेनेत प्रवेश 

ठाणे : दिग्गज नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. याला काही तास उलटत नाहीत तोच  भाजपला दुसरा धक्का देण्याची तयारी शिवसेनेने केली. मीरा भाईंदर विधानसभेच्या भाजपच्या सहयोगी आमदार गीता जैन या शनिवारी दुपारी मातोश्रीवर शिवबंधन बांधणार आहेत. त्यांचे आम्ही स्वागत करीत असल्याचे शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.


विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवून गीता जैन यांनी भाजपला आव्हान दिले आणि विजय ही मिळविला. त्यानंतर जैन यांनी सहयोगी आमदार म्हणून भाजपशी जुळवून घेतले. मात्र मेहता आणि जैन यांच्यातील संबंध काही सुधारले नाही. आमदार गीता जैन या शिवसेनेच्या संपर्कात होत्या. कारण शिवसेनेने देखील त्यांना विजयासाठी मदत केली होती.





 राज्यात सत्तातंतर झाले आणि जैन यांच्या शिवसेना प्रवेशाची शक्यता अधिक बळावली होती. या प्रवेशाबाबत शिवसेना प्रवक्ते आणि मिरा भाईंदर सहसंपर्कप्रमुख प्रताप सरनाईक म्हणाले की, मी त्यांचे पक्षात स्वागत करतो. शनिवारी दुपारी एक वाजता आमदार जैन यांचा मातोश्रीवर पक्ष प्रवेश होईल. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies